Sanjay Shirsat and Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

ठाकरेंना सांगा मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणारा तुमच्या मांडीवर; शिरसाट यांची राऊतांवर टीका

रवींद्र देशमुख

मुंबई - जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहे. यावरून राजकारण तापले असून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवर शिरसाट म्हणाले की, काही लोक समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. काही नालायकांनी कार्टून काढून डिवचण्याचा प्रयत्न केला होता. सरकारची आरक्षणासाठी आरक्षण देण्याची तयारी आहे. मराठा समाजाचा सर्वाधिक तिरस्कार उद्धव ठाकरेंनीच केल्याचा आरोप शिरसाट यांनी केला.

शिरसाट पुढं म्हणाले की, सत्तेच्या काळात आरक्षण का दिलं नाही. ही लढाई हक्काची असून आम्ही मराठा समाजासोबत आहोत. मात्र मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणारे संजय राऊत तुमच्या मांडीवर बसले आहेत. आम्ही मराठा समाजाला वेठीस धरणार नाही. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय शिंदे सरकार स्वस्थ बसणार नाही, असं आश्वासनही शिरसाट यांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

Latest Marathi News Live Update : कुसुमाग्रजांच्या नगरीत आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला होणार सुरुवात

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उकाडा वाढणार; मार्च उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT