महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: धाराशिवमध्ये राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये राडा; कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?

Maratha Reservation: राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांची आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. त्यामुळे नेत्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात, अशी मागणी होतेय.

संतोष कानडे

Maratha Reservation: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी त्यांची भेट व्हावी म्हणून राडा घातला आहे.

धाराशिवमध्ये राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी भेद द्यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.

राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांची आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. त्यामुळे नेत्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात, अशी मागणी होतेय.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना चर्चेसाठी आतमध्ये बोलावल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणावरुन राज ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र एवढा समृद्ध आहे की आरक्षणाची गरज नाही, असं विधान राज यांनी केलं होतं. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले आहेत.

राज्यामध्ये मराठा-ओबीसी संघर्ष पेटलेलं आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावमी व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका जाहीर कराव्यात, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

First-Time Flight Travel: पहिल्यांदाच विमान प्रवास करताय? मग अशी तयारी करा; प्रवास होईल सोयीस्कर

May 2026 Horoscope: मे महिन्यात रुचक योगाचा शुभ संयोग! कोणाला लाभ तर कोणाला सावध राहण्याची गरज? वाचा मेष ते मीन राशींचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT