Aditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: ठाकरे गटानं राज्यपालांची भेट घेत केली 'ही' विनंती; आदित्य ठाकरे म्हणाले...

मराठा आरक्षणासह विविध मागण्यासांठी उद्धव ठाकरे गटानं राज्यपाल रमेश बैस यांची बुधवारी भेट घेतली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठा आरक्षणासह विविध मागण्यासांठी उद्धव ठाकरे गटानं राज्यपाल रमेश बैस यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी राज्यपालांनी लक्ष घालवं अशी विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली. या बैठकीत नेमकी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Maratha Reservation Thackeray group met Governor Ramesh Bais and requested this Aditya Thackeray said)

आदित्य ठाकरे म्हणाले, "हे सरकार पूर्णपणे नालायक आहे, असं मी नाही तर काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या निकालात हे निरिक्षण नोंदवण्यात आलं होतं. (Latest Marathi News)

कारण, मराठा आरक्षणासाठी जालन्यात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. आम्ही राज्यपाल महोदयांना याबाबत विनंती केली की, राज्यात जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना बोलावून जरा समज देण्यात यावी. (Marathi Tajya Batmya)

कायद्यानुसार सर्वकाही चाललं पाहिजे

कायदा नावाचा काहीतरी प्रकार असतो, त्यानुसारच सर्वकाही चाललं पाहिजे. देशाच्या कायद्याचा वापर केला पाहिजे. पण तुम्ही पाहिलं तर हे लक्षात येईल की सध्याची सत्ता देखील बेकायदा आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT