Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तिन्ही पक्षांचे एकमत! विशेष अधिवेशन घेण्याची शक्यता...

Sandip Kapde

Maratha Reservation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाला तर काही ठिकाणी हिंसक वळण देखील लागले आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत कुणबी नोंदी असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण देण्याची सुरुवात करणार असल्याचे म्हटले आहे.

मात्र मनोज जरांगे पाटील सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. दरम्यान मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन त्यात मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याच्या मुद्द्यावर सरकारमधील तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ व प्रकाश शेंडगे हेही सागर बंगल्यावर दाखल झाले. पाऊण तासाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झाले.

वर्षावरील कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या बैठकीनंतर शिंदे व फडणवीस यांच्यातही बंदद्वार चर्चा झाली. तर आज शिवसेना आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलवली आहे. अशातच मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्या. शिंदे समितीचा अहवाल मांडून त्याला मंजूरी मिळेल. आजच्या बैठकीत मराठा समाजाच्या जनभावना आणि राज्यातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन विशेष अधिवेशन घेण्याची शक्यता आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

आंतरवाली सराटी येथे मराठ्यांचे उपोषण -

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालाची भेट घेतल्यानंतर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे. सरकारचा आज निर्णय काय राहतो आणि सरकार पातळीवर काय सांगितले जाते हे ऐकण्यासाठी मनोज जरांगे पाटील सकाळपासूनच लवकर उठून बसले आहेत. तसेच काल राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून लोक इथे येऊन जरांगे पाटलांना पाणी घेण्याचा आग्रह करत आहेत. राज्यभरातून लोक मोठ्या संख्येने येत आहे. आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज येणार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT