Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मालमत्तेच नुकसान करणाऱ्यांना अटक करुन गुन्हे दाखल करा; गृहमंत्र्यांच्या सुचना

Sandip Kapde

Maratha Reservation: मराठा आंदोलनाच्या दरम्यान राज्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. मनोज जरांगे पाटील यांनी जाळपोळ करू नका. जाळपोळ झाल्यास वेगळा निर्णय घेणार, असे ठाम सांगितले आहे. तरी देखील आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बैठक घेतली. यामध्ये कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

रात्री १० ते ११ अशी एक तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यभरातील जिल्हाधिकारी व सर्व पोलीस प्रमुख हजर होते. मराठा आंदोलनादरम्यान मालमत्तेचे व जीवितहानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुन्हे दाखल करुन अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात जर हिंसक वातावरण निर्माण होत असेल तर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सुचना देण्यात आले आहेत.

मालमत्तेच नुकसान करणाऱ्यांकडून भरपाई घेण्याबाबत देखील बैठकीत चर्चा झाली. राज्यात अनेक ठिकाणी बस, आमदारांचे घरं जाळण्यात आले.

बैठकीत काय घडलं?

  • पोलीस महासंचालकांनी दिवसभरातील घडामोडींचा आढावा समोर ठेवला

  • मराठा आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत. हे समाजकंटक शोधण्याचं काम सुरु (Latest Marathi News)

  • घर जाळणं, त्यातून चोऱ्या करण्याचा उद्देश समाजकंटकांचा आहे.

  • समाजकंटकांना आळा घालण्यासाठी पोलीसांच्या विविध तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या. गुप्तचर यंत्रणा यावर काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT