Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: "आंदोलनाची तीव्रता कमी करायची असेल तर..."; मराठा आरक्षण प्रकरणी रामदास आठवले करणार मध्यस्थी

Sandip Kapde

Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाची आग भडकत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता जेवण बंद करून पाणी पिणेही बंद केले आहे. मनोज यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काल (बुधवार) मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकाने सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे तसेच सरकारला वेळ द्यावा, यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले. मात्र मनोज जरांगे त्यांचा भूमिकेवर ठाम आहेत.

दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील यांची विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. यावर रामदास आठवले म्हणाले," मनोज जरांगे पाटील आग्रह करत असतील, तर दोन दिवसीय विधानसभेचे (मराठा आरक्षणावर) विशेष अधिवेशन बोलावणे अवघड आहे असे मला वाटत नाही. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मी त्यांना सुचवेन की जर आंदोलनाची तीव्रता कमी करायची असेल तर सरकारने याचा विचार करून विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे.

मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, "बैठकीत सर्व पक्षांनी आपले म्हणणे मांडले आणि प्रत्येकजण मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ होता. महाराष्ट्र सरकारने मार्ग काढला पाहिजे. जरांगे पाटील यांना वाटते की आता नाही तर कधीच नाही पण तसे नाही, आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. त्यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा."

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीवर काल नाराजी व्यक्त केली. "कोणताही राजकीय नेता आपला नाही. सर्वपक्षीय बैठक झाली मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मी पाणी घेणे सोडले आहे. महाराष्ट्र सरकारला माझा सल्ला आहे. तुम्ही कितीही मराठा युवकांवर गुन्हा दाखल करा एक लक्षात ठेवा की मराठ्यांची संख्या सहा कोटी आहे," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

"मी राज्य सरकारला इशारा देत आहे की, तुम्ही आरक्षण देण्यासाठी पावले उचलण्यास जितका वेळ कराल. तेवढी जास्त किंमत मोजावी लागेल. मी मराठा समाजाला वचन देतो की आरक्षणाचा हक्क आपल्याला मिळणार आहे आणि आम्ही जिंकू", असे जरांगे पाटील म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT