Maratha Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : क्युरेटिव्ह पिटीशनचा निकाल आज येणार?, 'हे' आहे कारण

क्युरेटिव्ह पिटीशनवरील सुनावणी मागील आठवड्यात बुधवारी पूर्ण झाली होती. त्याचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून आलेला नव्हता.

संतोष कानडे

नवी दिल्लीः क्युरेटिव्ह पिटीशनवरील सुनावणी मागील आठवड्यात बुधवारी पूर्ण झाली होती. त्याचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून आलेला नव्हता. आज शुक्रवारी तो निर्णय येण्याची शक्यता आहे.

ख्रिसमस सणाच्या निमित्ताने सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या आहेत. शनिवारपासून सुट्ट्या सुरु होत असल्याने शुक्रवारी कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. याशिवाय मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायपीठावर असणारे न्यायमूर्ती संजय किशन कौल हे २५ तारखेला निवृत्त होत आहेत. त्यांचाही कामकाजाचा शेवटचा दिवस आहे.

मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटीशनवरील न्यायाधीशांची चर्चा पूर्ण झालेली असून त्याचा निकाल येणं बाकी आहे. यासंबंधीच्या निकालावर न्यायाधीशांच्या केवळ सह्या बाकी असल्याचं सांगितलं जात आहे. आज त्याचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून जाहीर होऊ शकतो.

न्यायमूर्ती संजय किशन कौल यांची निवृत्ती महत्त्वाची मानली जात आहे. कारण न्यायपीठावर असलेले न्यायमूर्ती निवृत्त होत असतील तर त्याचापूर्वीच निकाल दिले जातात, त्यामुळे शुक्रवारी यासंबंधीचा निवाडा जाहीर होऊ शकतो.

राज्यात मराठा आरक्षणावरुन रान पेटलेलं आहे. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावरुन अनेकांची आपली भूमिका मांडली. एकीकडे छगन भुजबळ मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यास विरोध करीत आहेत. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत.

विधीमंडळातील चर्चेदरम्यान अनेक आमदारांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. तर काहींनी जरांगेंच्या काही भूमिकांना विरोध दर्शवला. त्यामुळे २४ तारखेला सरकार काय निर्णय घेणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

Alegaon Paga Murum Scam: आलेगाव पागा पाझर तलावातील कथित अवैध मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती? पर्यावरणप्रेमींची वरिष्ठ चौकशी व फेरपंचनाम्याची मागणी

Sillod Farmer: पीक कर्ज, पाण्याअभावी वाळलेले पीक; सिल्लोड तालुक्यात ३० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपवले

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

SCROLL FOR NEXT