Vinayak Mete esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षण संघर्षाची ज्योत पुन्हा पेटवणार; विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त शिवसंग्रामचा निर्धार

सकाळ डिजिटल टीम

देऊळगाव राजा: लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या जयंतीदिनी राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेबांच्या जन्मस्थळ सिंदखेडराजा ते स्वर्गीय विनायकराव मेटे यांचे स्मृतीस्थळ बीड मराठा आरक्षण संघर्षाची ज्योत पेटवणार असल्याचा निर्धार शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

येत्या ३० जून रोजी मराठा आरक्षण संघर्षाची ही ज्योत मातृतीर्थातून बीड कडे प्रस्थान करणार आहे. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी आयुष्यभर मराठा आरक्षणासाठी लढा दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. मराठा आरक्षणासाठी मोठमोठी आंदोलने केली.

शेवटी मराठा आरक्षणाच्या बैठकीला मुंबई येथे जात असताना अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न मागे पडला आहे.

मात्र मराठा आरक्षणा साठी संपूर्ण हयात लढा देणारे विनायक मेटे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्या जयंती निमित्त ३० जून रोजी मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रज्वलित ठेवण्या च्या उद्देशाने मराठा आरक्षण संघर्षाची ज्योत जिजाऊ मा साहेबांच्या जन्माने पावन झालेल्या मातृतीर्थातून निघणार आहे.

दरम्यान जिजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थळापासून ते स्व. विनायकराव मेटे यांचे बीड येथील स्मृतिस्थळापर्यंत मराठा आरक्षण संघर्षाची ज्योत पेटवणार असल्याचा निर्धार शिवसंग्राम संघटनेचे राजेश इंगळे, जहीर पठाण,अजमत खान, शंकर वाघमारे, संतोष हिवाळे, सुरेश निकाळजे, असलम खान,आदीं शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT