CM Eknath Shinde Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिलंय का? हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस

चार आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण देण्यात आलंय का? या जनहित याचिकेवरील आरोपांबाबत राज्य शासनानं आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. येत्या चार आठवड्यात सर्व प्रतिवादींनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं हायकोर्टानं म्हटलं आहे. (Maratha Reservation given keeping in mind ahead of Lok Sabha election Mumbai High Court Notice to Maha Govt)

भाऊसाहेब पवार यांनी यासंदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी आरोप केला की आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं १० टक्के मराठा आरक्षण लागू केलं आहे. हे आरक्षण समाजातील एकता, शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी याच्याविरोधात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकाराविरोधातील हे १० टक्के मराठा आरक्षण असल्याचंही त्यांनी या जनहित याचिकेत म्हटलं आहे. याप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यानंतर आता सहा आठवड्यांसाठी ही सुनावणी तहकूब करण्यात आली. दरम्यान, चार आठवड्यात या याचिकेतील सर्व प्रतिवादींनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT