ST 
महाराष्ट्र बातम्या

#MarathaKrantiMorcha 9 ऑगस्टची एसटीला धास्ती

ब्रह्मा चट्टे

मुंबई - मराठा आरक्षणासाठी 9 ऑगस्टला होत असलेल्या महाराष्ट्र बंदची एसटीला धास्ती लागली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर विभागीय नियंत्रकांना काळजी घेण्याच्या सूचना व्यवस्थापनाने दिल्या आहेत.

मराठा आंदोलनाची सर्वाधिक झळ एसटीला बसल्यामुळे बंदच्या दिवशी सेवा सुरू ठेवायची की बंद, या संभ्रमावस्थेत व्यवस्थापन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील आंदोलनामध्ये सरकारवरील रोषाचा सगळ्यात जास्त फटका एसटीला बसला आहे.

5 जून 2017 ते 18 जुलै 2018 दरम्यान एकूण 222 एसटी बसचे 60 लाख 88 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. मराठा आरक्षण आंदोलनामध्ये 365 गाड्यांची मोडतोड करण्यात आली आहे. यामुळे महामंडळाला तब्बल दीड कोटी रुपयांचा फटका बसला आहे. याशिवाय 22 कोटी 25 लाखांचा महसूलही बुडाला आहे.

मराठा समाजातील आंदोलक एसटीला लक्ष्य करीत नाहीत. काही समाजकंटक त्यांच्या आडून एसटीवर दगड मारतात. संघटनांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे एसटी सुरू राहतील. तोडलेल्या एसटी पुन्हा दुरुस्त करता येतील; पण मराठा आरक्षणासाठी गेलेले जीव परत येतील का?
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT