kusumagaraj Marathi Bhasha Din esakal
महाराष्ट्र बातम्या

Marathi Bhasha Din : इंग्रज पोलिसांनी कुसुमाग्रजांच्या कार्यालयात धाड का टाकली होती ? काय होतं त्यांचं खरं नाव

विष्णू वामन शिरवाडकर हे त्यांचे मूळ नाव नाही. काय आहे कुसुमाग्रजांचे मूळ नाव ?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : २७ फेब्रुवारी १९१२ रोजी कुसुमाग्रजांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते; पण लहान असतानाच काकांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले.

त्यांचे वडील वकील होते. त्यांना सहा भाऊ व कुसुम नावाची एक लहान बहीण होती. कुसुम ही घरातील सर्वांची लाडकी होती. एकुलती एक बहीण कुसुम असल्याने त्यांनी कुसुम से अग्रज अर्थात कुसुमाग्रज नाव धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपण नावाने लिहू लागले. ( literary career of kusumagraj)

कुसुमाग्रजांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमधील पिंपळगाव तालुक्यात झाले व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील महाविद्यालयातून पूर्ण केले.

वीस वर्षांचे असताना त्यांनी नाशिकमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून अहिंसात्मक आंदोलनात प्रवेश केला. या शिवाय आपल्या जीवनात त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

वीस वर्षांच्या वयात त्यांनी आपला पहिला मराठी कविता संग्रह 'जीवनलहरी' प्रकाशित केला. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहिणे सुरू केले. धार्मिक चित्रपट 'सती सुलोचना'मध्ये त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले.

नंतर काही काळ नियतकालिके व वृत्तपत्रांमध्ये संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९४२ हे वर्ष त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे होते. याच वर्षी मराठी भाषेचे ध्येयवादी लेखक वि. स. खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचा 'विशाखा' हा कवितासंग्रह स्वखर्चाने प्रकाशित केला.

१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याची चळवळ सुरू असताना ते 'प्रभात' या दैनिकात काम करायचे. आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार' ही देशाला स्फूर्ती देणारी कविता लिहिली.

या कवितेतून मराठी भाषेतील स्फुल्लिंग ज्वालाप्रमाणे बाहेर पडले. त्यांची ही कविता वाचून इंग्रज पोलिसांनी त्यांच्या कार्यालयात धाड टाकली. कार्यालयात काम करणाऱ्या लोकांची नावे पाहिली तर त्यात कुसुमाग्रज नाव सापडलेच नाही कारण रजिस्टरमध्ये कुसुमाग्रजांचे नाव वि.वा. शिरवाडकर लिहिले होते.

विशाखा' या काव्यसंग्रहानंतर त्यांनी अनेक नाटके कवितासंग्रह, कथासंग्रह लिहिले. त्यांच्या नटसम्राट', 'वीज म्हणाली धरतीला' या नाटकांना विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कारानेही गौरविण्यात आले. 'ज्ञानपीठ पुरस्कार' मिळविणारे मराठी भाषेतील ते दुसरे लेखक होते.

या शिवाय त्यांनी अक्षरबाग, किनारा, मराठी माती, प्रवासी पक्षी श्रावण, जीवन लहरी इ. प्रसिद्ध काव्यसंग्रह लिहिले. मार्च १९९९ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

मराठी भाषेतील एक प्रसिद्ध कवी म्हणून आजही मराठी वाचक आणि रसिकप्रेमी जनतेच्या मनात ते जिवंत आहेत. कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील काव्यात असणारे स्थान कायम अग्रगण्य राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT