raj thackeray
raj thackeray 
महाराष्ट्र

Marathi Bhasha Din: मराठी भाषा शब्दकोष काढणारा राजा...;राज ठाकरेंच्या आवाजातील व्हिडिओ मनसेकडून ट्विट

कार्तिक पुजारी

मुंबई- आज मराठी भाषा गौरव दिन आहे. या दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्मान सेनेकडून राज ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असामान्य आणि अद्भूत कार्याचा राज ठाकरे यांच्याकडून गौरव करण्यात आला आहे. (marathi Bhasha Din shivaji maharaj Video in Raj Thackeray voice Tweet from MNS)

माझी भूमी स्वतंत्र भूमी आहे. ही हिंद भूमी आहे. इथे भाषा देखील माझीच असली पाहिजे. माझ्यावर फारशी भाषा लादून चारणार नाही. पण, म्हणून त्यांनी बदललेले जे शब्द आहेत. मराठी भाषा शब्दकोष महाराजांनी काढला. नाणी स्वत:ची काढली. पन्नास वर्षाच्या काळात या माणसाकडून जे घडलं आहे ते अद्भूत आहे. मला या सगळ्या दंतकथा वाटतात, असं राज ठाकरे व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

फक्त लढाया, कोथळा म्हणजे शिवचरित्र नाही तर स्वाभिमानासाठी, स्वराज्य कारभारासाठी भाषा संशोधन, भाषाकोष अशा कालातीत संकल्पनांची रुजवण म्हणजे शिवचरित्र..., असं एक्सवरील पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणण्यात आलं आहे.

आज मराठी भाषा गौरव दिन आहे. कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकार मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करते. २७ फेब्रुवारी १९१२ रोजी कुसुमाग्रजांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते.

लहान असतानाच काकांनी त्यांना दत्तक घेतले होते. तेव्हा त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. छोटी बहीण कुसुमच्या नावावरुन त्यांनी कुसुमाग्रज नाव धारण केल्याचं सांगितलं जातं. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT