vidhan bhavan sakal
महाराष्ट्र बातम्या

सर्व दुकानांवर झळकणार मराठी पाट्या

मद्याची दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड किल्ल्यांची नावे लिहिता येणार नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मद्याची दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड - किल्ल्यांची नावे लिहिता येणार नाही. तसेच यापुढे दह पेक्षा कमी कामगार असणाऱ्या दुकानांना देखील मराठी भाषेचा नामफलक लावणे बंधनकारक असणार आहे.

मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (फॉन्ट) ह इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही, याची काळजी दुकानदारांना घ्यावी लागणार असल्याचे नियमावलीत नमूद केले आहे. याचे उल्लंघन केल्यास एक लाखापर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. वारंवार उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन लाखांपर्यंतचा दंड वसूल केला जाणार आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमान्वये दहापेक्षा कमी कामगार नोकरीवर ठेवणाऱ्या दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेचा नामफलक लावणे बंधनकारक आहे. मराठी देवनागरी लिपीतील नामफलकाचा अधिनियम दिनांक १७ मार्च रोजी जारी झाला असून यापुढे सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलक अनिवार्य असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT