Chocolate Day Sakal
महाराष्ट्र बातम्या

Chocolate Dayला धुमाकूळ घालणारा 'मोरडे चॉकलेट ब्रँड' पुण्याच्या मराठी माणसाने सुरू केलाय

दत्ता लवांडे

आज जागतिक चॉकलेट डे. लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या आवडत्या पदार्थाचा दिवस. जेवनानंतर किंवा काही गोड खावं वाटलं तर आपल्या पुढ्यात असतो तो चॉकलेट मिश्रीत गोड पदार्थ. पण चॉकलेट म्हटलं की आपल्याला आठवते ती मोरडे चॉकलेट. मोरडे हा ब्रँड महाराष्ट्रासोबतच जगभरात प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रात आणि देशभरात मोरडे चॉकलेट ब्रँडचा मोठ्या प्रमाणावर खप होतो. पण तुम्हाला माहितीये का, की मोरडे चॉकलेट पुण्याच्या एका छोट्या गावात सुरू झालेलं होतं. याच मोरडे चॉकलेटचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत.

31 डिसेंबर 1983. या दिवशी श्री. चंद्रकांत मोर्डे यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर येथे कोको उत्पादन बाजारपेठेत इतर सर्वांना मागे टाकणाऱ्या कंपनीचा पाया रोवला. चंद्रकांत मोर्डे यांना फूड टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव होता. त्यांनी आपल्या घरातील व्यक्तीपासून कामाला सुरूवात केली. त्यांची गुंतवणूकही तोडकीच होती. सध्या त्यांनी अनेक प्रकारच्या चॉकलेटची निर्मिती या कारखान्यात केली आहे. सुरूवात 3 उत्पादनापासून सुरू केलेल्या कारखान्यात आजच्या घडली 150 प्रकारचे चॉकलेट तयार होतात.

ज्या व्यवसायांना चॉकलेटची गरज आहे त्यांच्यासाठी मॉर्डे हा आजचा ब्रँड आहे. ते चॉकलेट, फिलिंग्स, क्रीम्स, कंपाऊंड्स, कोको उत्पादने, सजावट, चॉकोपेस्ट आणि अगदी चोकोडिप्स सुद्धा उत्पादित करतात. त्याचबरोबर HoReCa, बेकरी, आईस्क्रीम, QSR, होम बेकिंग आणि कन्फेक्शनरी क्षेत्रात सुद्धा यांचे उत्पादने असतात.

येथील प्रत्येक उत्पादने विशेष काळजी घेऊन तयार केले जातात. या ब्रँडच्या वाढीसाठी मोरडे ग्रुप मंचर येथील स्थानिक शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे श्रेय असल्याचं सांगतात. मागच्या जवळपास ४० वर्षे हा ब्रँड आपल्या महाराष्ट्राची शान वाढवत आहे. तर चॉकलेट डेच्या दिवशी याच ब्रँडचा वापर केला जातो हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT