drama theater esakal
महाराष्ट्र बातम्या

Marathi Drama and Movie : मराठी प्रेक्षकांना तिकीटे स्वस्त दरात द्या! सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीची शिफारस

मराठी नाटक आणि सिनेमाकडे प्रेक्षकांची पावले पुन्हा वळावीत, यासाठी तिकिटदरात सवलत द्यावी, अशी शिफारस सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीने केली आहे.

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - मराठी नाटक आणि सिनेमाकडे प्रेक्षकांची पावले पुन्हा वळावीत, यासाठी तिकिटदरात सवलत द्यावी, अशी शिफारस सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीने केली आहे.

सध्या सिने आणि नाटयनिर्मात्यांना शासन अनुदान देते आणि त्यामुळे निर्मितीची संख्या वाढली आहे, पण प्रेक्षकांनी या निर्मितीचे स्वागत करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांची पावले चित्रपटगृहे, नाट्यगृहाकडे वळावीत यासाठी शासनाने स्वस्त दरात तिकिटे उपलब्ध करुन द्यावी, असे शिफारशींचे स्वरूप असल्याचे समजते.

नाटक आणि मराठी चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या वाढली तर मागणी वाढेल, असे समितीला वाटते. सध्या निर्मितीसाठी अनुदान दिले जाते. या निर्णयात बदल करीत तो लाभ ग्राहकांपर्यंत पोहचावा, असे समितीला वाटते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय?, भावना दुखावल्या गेल्याचे कारण सांगत कलाकृतीवर येणारी बंदी नेमकी कोणत्या कारणांसाठी आणावी? याचा विचार करण्याच्या शिफारशीही धोरणात करण्यात आल्या.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आज समितीने अहवाल सोपवला. हा अहवाल मंत्रिमंडळापुढे ठेवून नंतर तो अधिवेशनात मांडला जाईल. सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीने नवे धोरण तयार करताना प्रेक्षक हा केंद्रबिंदू मानून विचार करावा, असे सुचवले गेले होते. सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी अंतिम अहवाल सादर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT