महाराष्ट्र

सीबीएसई, आयसीएसईसह सर्व बोर्डाच्या शाळात मराठी अनिवार्य : मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील सीबीएससी, आयसीएसई आणि सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करणार असून, त्यासाठी कठोर कायदा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली.

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे सक्तीचे करावे या मागणीसाठी काही प्रमुख साहित्यिक मुंबईत आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत या पार्श्वभूमीवर शिबसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता . येत्या सोमवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात लक्ष्मीकांत देशमुख, अरुणा ढेरे आदी उपस्थित राहणार आहेत. 

इतर राज्यात तिथली भाषा अनिवार्य आहे यासंदर्भात त्या त्या राज्यात असलेला कायद्याबाबतची माहिती या साहित्यिकांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिली आहे असे गोऱ्हे यांनी सांगितले. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. साहित्यिकांच्या शिष्टमंडळाला आपण भेटीसाठी वेळ देणार आहोत आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्याकडे जबाबदारी देणार असल्याची माहिती मुखमंत्री फडणवीस यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT