PM Modi 
महाराष्ट्र बातम्या

Marathi language: मराठी भाषा ही भारताचा अभिमान! अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर मोदींकडून गौरवोद्गार, वाचा नेमकं काय म्हणाले?

PM Modi Marathi language: गेल्या ६० वर्षांपासून याबाबत मराठी माणसाचा लढा सुरु होता. याला अखेर यश आले असं म्हणावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.

कार्तिक पुजारी

Marathi Language News: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. १४ कोटी महाराष्ट्रीयन लोकांसाठी ही अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. गेल्या ६० वर्षांपासून याबाबत मराठी माणसाचा लढा सुरु होता. याला अखेर यश आले असं म्हणावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.

मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल, असं मोदी म्हणाले आहेत.

मराठी माणसाच्या गेल्या ६० वर्षाच्या संघर्षाला अखेर यश आलं आहे. त्यामुळे राज्यातील तमाम जनतेने आनंद व्यक्त केला आहे. राज्यातील नेते, कलाकार, सिलेब्रिटी यांनी यावर प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाला महत्त्व आहे. केंद्र सरकारने मराठीसोबत अन्य पाच भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा मराठी भाषेसाठी ऐतिहासिक असून आजचा दिवस सोनेरी दिवस असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आभार मानताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने आम्ही पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT