File photo of Jayant Patil
File photo of Jayant Patil 
महाराष्ट्र

मुख्यमंत्री महोदय, आमदारांची सुटका करा : जयंत पाटील

ब्रह्मा चट्टे

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी पेनड्रायव्हमध्ये आमदारांकडे दिलीय. आता लोकांचे आमदारांना फोन येत आहेत. उद्या लोकांच्या रांगा आमदारांच्या घरासमोर लागतील. त्यामुळे कर्जमाफीची यादी वेबसाईटवर टाकून मुख्यमंत्री महोदय आमदारांची सुटका करा असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केले.

जयंत पाटील म्हणाले, "सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर आम्ही यादी मागितली. म्हणून कर्जमाफीची यादी पेन ड्राईव्हमध्ये दिली. पण त्यामुळे जनता आमदारांना फोन करत आहे. आमचं नावं यादीत आहे का, म्हणून विचारत आहेत. त्यामुळे आता लोक आमदारांच्या घरासमोर रांग लावतील. त्यामुळे कर्जमाफीची यादी वेबसाईटवर टाकून मुख्यमंत्री महोदय आमदारांची सुटका करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पेन ड्राईव्हमध्ये दिलेली कर्जमाफीची यादी ही बँकनिहाय आहे. त्यात एका तालुक्यातील बँकेने दुसऱ्या तालुक्यातील लोकांना कर्ज दिले आहे. ते त्या यादीत दुसऱ्या तालुक्यातील लोकांचे नावे दिसतील त्यामुळे लोकांमध्ये पुन्हा गैरसमज होईल. त्यासाठी कर्जमाफीची यादी साईटवर टाकली नाही.''

'तालुकानिहाय यादी बनवून लवकरात लवकर ती यादी वेबसाईटवर टाकू. त्याचबरोबर ही यादी इंग्रजीत आहे. त्यामुळे ही यादी मराठीत करून लवकरच ते वेबसाईटवर टाकण्यात येईल', असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT