महाराष्ट्र

जिल्ह्यातील आणखी ३६ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

सकाळवृत्तसेवा

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आणखी दोन याद्या राज्य सरकारने प्रसिद्ध केल्या आहेत. जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केलेल्या उर्वरित शेतकऱ्यांच्या पुढील याद्या जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील तीन लाख दोन हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या योजनेसाठी राज्य सरकारकडे अर्ज केले होते. त्यापैकी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून (पीडीसीसी) एक लाख ६९ हजार आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांमधून सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज करताना काही शेतकऱ्यांकडून तांत्रिक चुका झाल्या होत्या. पुणे जिल्ह्यातील एक लाख ३४ हजार ७१४ आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील ३४ हजार शेतकऱ्यांचाही त्यात समावेश होता. त्यापैकी ३६ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी दिली. 

‘पीडीसीसी’मध्ये दोन लाख २० हजार शेतकऱ्यांची खाती आहेत. कर्जमाफी 
योजनेअंतर्गत बॅंकेकडे जमा झालेल्या सुमारे ४०५ कोटी रुपयांचे वितरण झाले. त्यात ८५ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर सुमारे १३९ कोटी रुपये मिळाले असून, ४८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. त्यात ३६ हजार शेतकऱ्यांची वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT