महाराष्ट्र बातम्या

राज्यपाल म्हणतात शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल 

जगन्नाथ पाटील

कापडणे : राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी कृषी भूषण अॅड् प्रकाश पाटील (पढावद,धुळे), नरेंद्र पाटील (लोणी, जळगाव), हेमंत देशमुख (वाशिम), उत्तमराव ठोंबरे (नाशिक), शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी कृष्णा पवार (औरंगाबाद), अनंता पाटील (हिंगोली), व श्रीकांत आखाडे (जालना) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातील शेती विंषयक विविध समस्या मांडल्यात. सोडविण्यासाठी आग्रह धरला. राज्यपाल कोश्यारी यांनी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ठोस भूमिकाही मांडली.

शेतकर्‍यांना 24 तास वीज हवी

शेतकर्‍यांना कृषी पंपासाठी चोवीस तास वीज हवी. राज्यात सर्वांना चोवीस तास वीज दिली जाते. शेतीकरीता फक्त आठ तास आहे. तीही कमी दाबाने दिली जाते. कोरोना काळात विजेचा वापर अत्यंत कमी झाला. वीज शिल्लक असुनही शेतकऱ्यांना ज्यादा दिली गेली नाही.काही वेळी विज अतिरिक्त असल्यावर सुध्दा शेतकऱ्यांना पुर्ण वेळ वीज दिली जात नाही. शेतकरी पाणी व जमीन असल्यास एक विहीर ऐवजी दोन तिन विहीरी त्याच्या गरजेनुसार वापर करतो. त्याला पाहिजे असेल तेवढी विज वापरतो. जमीनीतुन पाण्याचा उपसा करतो. त्याचा खर्च वाढतो व देखभाल खर्च सुद्धा वाढतो. विजेचे जास्त कनेक्शन दिल्यामुळे शासन जे अनुदान देते. ते सुद्धा वाढते. शासनाचा खर्च वाढतो. आठ तास विज दिली जात असल्याने सर्व शेतकरी विहीरीवर आॅटो बसवुन एकाच वेळी पंप चालु करतात, त्यामुळे जनित्रावरचा भार वाढतो. ते बंद पडतात. विद्युत कंपनीचा खर्च वाढतो. शेती करीता स्वतंत्र फिडर करण्यामुळे सुध्दा कंपनीचा भरपुर खर्च झालेला आहे. चोवीस तास विज उपलब्ध करून दिली तर विजेचा वापर थोडाफार वाढेल. मात्र शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च व देखभाल खर्च कमी होईल. उत्पादन वाढेल. शासन विद्युत जोडणी वर जे अनुदान देते ते वाचेल.विज वितरण कंपनीचा विद्युत जनित्राचा देखभाल खर्च कमी होईल. शेतकरी त्याच्या सोयीनुसार विजेचा वापर करेल.यावर राज्यपाल कोश्यारी यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन वाढीसाठी विज उपलब्ध करून द्यावयास पाहिजे, असे सांगितले.

ट्रीगर शेतकर्‍यांना नुकसानकारक

हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेत मागील वर्षी ट्रिगर (हवामानाचे धोके)मध्ये बदल करुन शेतकऱ्यांना नुकसान कारक करण्यात आले. जे ट्रिगर कधी येऊच शकत नाहीत, असे ट्रिगर ठेवण्यात आले. हे ट्रिगर विशेषतः केळी व डाळींब फळपिकांचे जास्त नुकसान कारक आहेत. 2019 ला जे ट्रिगर होते. तेच पुढील वर्षी करीता ठेवावेत अशी मागणी केली. याबाबत कृषी मंत्री, मुख्यमंत्री यांनी आश्र्वासन दिले आहे. मात्र ट्रिगर ठरवितांना शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करतांना या बाबत नकार दिला जात आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT