महाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात आळे येथे शेळ्या ठार 

सकाळवृत्तसेवा

आळेफाटा - आळे (ता. जुन्नर) येथे आज पहाटे अंबिकामाता मंदिराजवळ (विद्युत उपकेंद्र) बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यातील १ शेळी, १ बोकड व १ करडू ठार झाले. याव्यतिरिक्त १ करडू बिबट्याने पळवून नेल्याचे सांगण्यात आले. 

दशरथ भंडलकर यांच्या घराशेजारी शेळ्यांचा गोठा आहे. जवळच मक्‍याचे शेत असून, तेथून काही अंतरावर पिंपळगाव जोगे कालवा आहे. त्यांनी शेळ्या गोठ्यात बांधल्या होत्या. आज पहाटे बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. वनरक्षक आकाश तंगडवार यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. घराजवळ बिबट्याची पावले आढळल्याचे तंगडवार यांनी सांगितले. परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह सरपंच वर्षा कुऱ्हाडे व उपसरपंच मीननाथ शिंदे यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT