Shivsena
Shivsena 
महाराष्ट्र

परिचारकांच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक; सभात्याग करत सरकारचा निषेध

ब्रह्मा चट्टे

मुंबई : विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांचे निलबंन रद्द करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना आज दुसऱ्या दिवशी आक्रमक आहे. कामकाजाला सुरवात होताच शिवसेना सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज 15 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज रेटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला.

विधानसभेच्या आजच्या सातव्या दिवसाच्या कामकाजाला सुरवात होताच शिवसेना सदस्यांनी आक्रमक होत प्रशांत परिचारकांच्या निलबंनाचा मुद्द्यावर घोषणा द्याला सुरवात केली. तर भाजपच्या सदस्यांनी विधान परिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निलबंनाची मागणी करत गोंधळ घालण्यास सुरवात केला. त्यावेळी याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्याचे स्वागत विरोधीपक्षांनीही केले. मात्र, प्रशांत परिचारकांच्या निलबंन रद्दच्या मुद्दयावर शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनिल प्रभू यांनी विधानसभा कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जे काही आवश्यक असेल ते केले जाईल असे सांगितले. त्यावर असहमती दर्शवत सुनिल प्रभू म्हणाले," आम्ही वारंवार प्रशांत परिचारकांच्या बडतर्फीची मागणी करत आहोत. मात्र, सरकार कामकाज रेटून नेत आहेत. त्यामुळे आम्ही निषेध करत सभात्याग करत आहोत."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT