Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

मी कालची मुलाखत चोरुनही पाहिलेली नाही: उद्धव

समीर सुर्वे

मुंबई : मी कालची मुलाखत चोरुनही पाहिलेली नाही. शिवसेना प्रमुखांचा निर्णय कधीच चुकलेला नाही हे कालच्या मुलाखतीतून समोर आले. त्यावेळी पवार साहेबांनी मंडळ आयोगाचे भूत निर्माण केले. ज्या ज्या भूमिका शिवसेना प्रमुखांनी मांडल्या त्या तेव्हा जर मानल्या गेल्या असत्या तर आज जातीपातीवरून जी परिस्थिती उद्भवली ती उद्भवली नसती, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, की बँक बुडाल्यास ठेविदारांच्या पैशांची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी. यासाठी शिवसेना अर्थमंत्र्यांशी चर्चा करणार. पीएनबी गैरव्यवहारामुळे राफेलचा गैरव्यवहार मागे पडला. लोकसभा निवडणुकीला अद्याप वेळ आहे. नाणर रिफायनरी बाबत मुख्यमंत्र्यांनी विधान बदलले नाही. पवारसाहेब पण समाना वाचत असावेत. 50 वर्षांत शिवसेना प्रमुख याच विषयावर बोलत होते. पण तेव्हा कुणी त्याला पाठिंबा दिला नव्हता. टीका करायची तेव्हा टीका करायची हा बाळासाहेबांचा स्वभाव त्यांनी मागून पाठीत खंजीर नाही खुपसला. त्यावेळी शिवसेना प्रमुखांना अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुणी आपुलकी नाही दाखवली. ते तुरुंगात कसे जातील अशीच भूमिका होती.

बाळासाहेब समजायला 50 वर्ष लागलीत काहींना अजून समजले नाहीत. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली. तुमच्याही काळात मुंबई तोडायचा कट होता. शिवसेना खंबीर आहे, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT