मुंबई : मुंबईतील शिक्षकांचे पगार युनियन बँकेतून मुंबै बँकेत ढकलण्याचा शासन निर्णय शुक्रवारी उच्च न्यायालयाने रद्द ठरवला. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी शासनाच्या 3 जून 2017 च्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
याचिकेवरील सुनावणीदरम्यान सीनिअर काैसिंल अॅड. राजीव पाटील यांनी सुमारे दीड तास शिक्षकांची बाजू उच्च न्यायालयासमोर मांडली. त्यानंतर शासनाच्या वतीने अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी जिल्हा बँकांना बळकटी देण्यासाठी घेण्यात येणार्या निर्णयाचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने केवळ मुंबईसाठी घेतलेला निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त केली.
राज्यभर जिल्हा बँका बुडाल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते उघडावे लागते, असे असताना गेली अनेक वर्षांपासून शिक्षकांना व शिक्षकेतरांना नियमित पगार देणाऱ्या युनियन बँकेला बदलण्याचे कारण काय? असा सवाल न्यायालयाने केला. न्यायालयासमोर दररोज मुंबै बँकेच्या भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे असताना अशा प्रकारचा निर्णय शिक्षण विभागाने घेणे गैर असल्याचे म्हटले. तसेच शिक्षणमंत्री विरोधी पक्ष नेता असताना ज्या मुंबै बँकेवर कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतात तेच विनोद तावडे शिक्षणमंत्री झाल्यावर मुंबै बँकेच्या सांपत्तिक स्थितीबद्दल प्रशंसा करतात हे अतिशय चुकीचे आहे, अशा शब्दात उच्च न्यायालयाने शिक्षणमंत्री विनोद तावडेंना फटकारले.
मुंबै बँकेच्या वतीने सीनिअर काैसिंल गोडबोले यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावर हायकोर्टाने पगार वितरणाबद्दल सुरु असलेली अनियमितता, बोगस कर्ज वाटप आणि केवायसी शिवाय उघडली जाणारी अकाऊंटस् याबाबत खडसावले.
शिक्षक भारती ही राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची मान्यताप्रप्त संघटना असून शिक्षकांच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी दाखल केलेली याचिका योग्य आहे, असा निर्वाळा न्यायमूर्तींनी दिला. न्यायालयाने ३ जून २०१७ चा शासन निर्णय पूर्णपणे रद्द करुन मुंबईतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी पगार खाती पूर्ववत युनियन बँकेत तात्काळ सुरु करण्याचे स्पष्ट आदेश दिले. आज सकाळपासून कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीसाठी शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे आणि कार्यवाह प्रकाश शेळके उपस्थित होते.
शिक्षक भारतीच्या वतीने सीनिअर काैसिंल अॅडव्होकेट राजीव पाटील, अॅड. मिलिंद सावंत आणि अॅड. सचिन पुंदे यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.