महाराष्ट्र बातम्या

शिवसेनच्या क्षितिजावर नवा सूर्य; नव्या ठाकरेंची राजकारणात एंट्री?

गोविंद साळुंखेसह सचिन अग्रवाल

आदित्य ठाकरेंनी निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आणि त्यापाठोपाठ एक नवी चर्चा सुरु झाली ती म्हणजे तेजस ठाकरेच्या राजकीय एंट्रीची. या चर्चेला निमित्त ठरलंय ते तेजसने वडिलांसह मंचावर लावलेल्या हजेरीचं. संगमनेरमधल्या सभेत मंचावर बड्या नेत्यांच्या गर्दीत, एका चेहऱ्यानं लक्ष वेधलं तो चेहरा होता तेजस ठाकरेंचा. 

तेजस ठाकरे हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं ते मागच्या वर्षी. मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीवेळीही तेजस आदित्य ठाकरेंसोबत पोस्टरवर झळकला. तेव्हापासूनच युवासेनेची जबाबदारी तेजसकडे जाणार अशी चर्चा रंगतेय. आता तेजसचे थोरले बंधुराज आदित्य निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर तेजसही सक्रीय राजकारणात येण्याची शक्यताय. 

तेजसचं नाव आजवर राजकारणा व्यतिरिक्त इतर आवडीनिवडींसाठीच चर्चेत राहिलं.

  • बॉम्बे स्कॉटिशमधून तेजसचं शिक्षण झालंय
  • पुढे त्याने धीरुभाई अंबानी शाळेतून शिक्षण घेतलं
  • त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो इंग्लडला गेला
  • तेजसला वन्यजीवांचा अभ्यास करण्याची आवड आहे
  • त्याने आतापर्यंत खेकड्यांच्या 11 प्रजाती शोधून काढल्यात
  • तसंच बोईगा ठाकरे या सापाच्या नव्या प्रजातीचाही त्यानं शोध लावला 

राजकारणात एंट्रीपूर्वी तेजसची ट्रेनिंग सुरु असल्याचं बोललं जातंय.. उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा याचेच संकेत देतेय. एकीकडे सेनेचं सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याच्या दिशेनं झेपावलंय. तर दुसरीकडे तेजस ठाकरेंच्या रुपाने शिवसेना सूर्ययान 2 प्रक्षेपित करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. आता हे सूर्यायान दोन कधी झेपावतं, याची प्रतीक्षा शिवसेनेसह अवघ्या महाराष्ट्राला आहे.

WebTitle : marathi news mumbai tejas thackeray may join active politics 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा सरकारला कडक इशारा! दोषमुक्तीच्या याचिकांवर विलंब केला तर थेट अवमान कारवाई... इतर राज्यांना संदेश

Washim News: सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाची एन्ट्री;जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; दिग्गजांना हादरा

Latest Marathi News Live Update : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेची सर्व तयारी पूर्ण; उद्या मुख्य यात्रा

Pimpri News: अपघात आणि बेपत्ता नोंद एकाच पोलीस ठाण्यात, तरी तपासाची तसदी घेतली नाही; CRPF जवानाच्या मृत्यूचा ५ दिवसांनी उलगडा..

Buldhana News: तहसीलदारावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न; रेतीमाफियांची मुजोरी वाढली; सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले वाहन

SCROLL FOR NEXT