महाराष्ट्र

आमदारांच्या ‘पीएं’ना लॉबीत प्रवेश नाकारला

सकाळन्यूजनेटवर्क

नागपूर - आमदारांच्या स्वीय सहायकांना यंदा विधानभवनाच्या ‘लॉबी’त प्रवेश नाकारण्यात आला आहे. यावर सर्व स्वीयसहायकांनी नाराजी व्यक्त केली आहे. माहिती दडविण्याचे हे एक राजकीय षड्‌यंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला.

विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आमदारांना अनेक विषयांची माहिती हवी असते. त्यासाठी स्वीय सहायकांना लॉबीत जावे लागते. यंदा मात्र त्यांना लॉबीत प्रवेश देण्यास नकार देण्यात आला आहे. सकाळीच सर्व आमदारांच्या सहायकांना प्रवेश नाकारत बाहेर काढण्यात आले. यावर आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, ‘‘आमदारांना माहिती हवी असते. लॉबीत कागदपत्र ठेवलेली असतात. प्रवेश नाकारल्याने अपूर्ण आणि अयोग्य माहिती आमदारांपर्यंत पोचण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आमदारांचा वेळ वाया जातो. स्वीय सहायकांना सुरक्षा रक्षक लॉबीतून बाहेर काढतात. यामागे माहिती दडविण्यासाठी हे राजकीय षड्‌यंत्र आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सुरक्षेच्या कारणावरून यासंदर्भात जारी केलेले आदेश मागे घ्यावेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT