marathi news sakal media SmileWithSakal campaign youth connect smile photo share social media
marathi news sakal media SmileWithSakal campaign youth connect smile photo share social media 
महाराष्ट्र

शेअर करा आपले दिलखुलास हास्य 'स्माईल विथ सकाळ' सोबत

सकाळ डिजिटल टीम

येत्या काळात तरुण मनाशी जास्तीत जास्त 'कनेक्ट' होण्यासाठी आम्ही सज्ज..आपल्या मनाचा वेध घेत आम्ही आलोय 'स्माईल विथ सकाळ' घेऊन. चला तर मग नवीन जोशाचे आपल्यासारखे हजारो युवा चेहरे तयार आहात ना आपले निखळ हास्य शेअर करायला? तुम्हीही सहभागी व्हा 'स्माईल विथ सकाळ' मध्ये...

'सकाळ' घेऊन येत आहे स्माईल विथ सकाळ हे कॅम्पेन फक्त आपल्या माणसांचं हास्य साऱ्या जगापर्यंत पोहोचविण्यासाठी. सेल्फीप्रिय असलेल्या लोकांचा समुह आज खुप मोठा आहे. यातले तर काही पार सेल्फीवेडेही आहेत. पण नुस्तीच सेल्फी काढून आपल्याकडे संग्रह करण्यात तोच तो पणा आलाय असं नाही वाटत आपल्याला? म्हणजे त्या सेल्फीला जर योग्य प्लॅटफॉर्म मिळालं तर किती छान नाही का! पण ही संधी मिळणार कुठे? आणि ही संधी देणार कोण? आपल्या लोकांना संधी नाही तर साथ दिली जाते. मग उचला मोबाईल आणि करा स्माईल! तुमचे हसरे फोटो sakalsmiles@gmail.com वर आम्हाला पाठवा. किंवा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर #SmileWithSakal हा हॅशटॅग वापरुन आपला हसरा फोटो शेअर करा. लवकरच #SmileWithSakal 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होईल. 

सत्त्याऐंशी वर्षांची परंपरा आता तरुणाईच्या हाती देण्याची वेळ आली आहे. मोठ्यांचे मार्गदर्शन तर नेहमी मोलाचे आहेच. पण 'सकाळ'चे पडते पाऊल आता तरुणाईच्या सोबत मार्गक्रमण करण्यास सज्ज झाले आहे. याची सुरवात नवीन जोशाच्या आपल्यासारख्या हजारो युवा चेहऱ्यांवर गोड हास्याने व्हावे या हेतूने स्माईल विथ सकाळ हे कॅम्पेन राबविले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT