Hawaman_web 
महाराष्ट्र बातम्या

भिरा देशात सर्वांत उष्ण; पारा ४०.५ अंशांवर

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील उन्हाचा ताप वाढल्याने तापमानाचा पारा वर चढू लागला आहे. उच्चांकी ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने कोकणातील भिरा हे देशाातील सर्वांत उष्ण ठिकाण ठरले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. 

मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती अाहे. त्यापासून लक्षद्वीप बेटांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. भिरा येथे दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा ३.४ अंशांची वाढ झाली आहे. रविवारी राज्यात अंशत: ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शनिवारी (दि. १०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.३, नगर ३८.४, जळगाव ३५.४, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्वर ३१.१, मालेगाव ३६.०, नाशिक ३५.२, सांगली ३६.६, सातारा ३६.० सोलापूर ३८.६, मुंबई ३१.०, अलिबाग ३१.२, रत्नागिरी ३२.८, डहाणू ३०.९, भिरा ४०.५, औरंगाबाद ३६.०, परभणी ३८.४, नांदेड ३७.०, बीड ३७.८, अकोला ३८.६, अमरावती ३५.४, बुलडाणा ३४.४, ब्रह्मपुरी ३६.२, गोंदिया ३३.०, नागपूर ३२.३, वाशिम ३७.८, वर्धा ३४.०, यवतमाळ ३५.५. 

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र
नैऋत्य बंगालच्या उपसागरात तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. रविवारी सकाळपर्यंत या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जोरदार वारे, मेधगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. समुद्र किनाऱ्यालगत जोरदार वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT