महाराष्ट्र बातम्या

WhatsApp अॅडमीनवर निवडणूक आयोगाचा डोळा; महाराष्ट्रातील 12 ग्रुप्सवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

तुम्ही जर WhatsApp ग्रुपचे अॅडमीन असाल तर जरा सावध व्हा. कारण, आता निवडणूक आयोगाचा तुमच्यावर डोळा आहे. महाराष्ट्रात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 12 WhatsApp अॅडमीन्सला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. 
   
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या 12 WhatsApp ग्रुप्सवर ही कारवाई करण्यात आलीये. नांदेडमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. प्रत्येक पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयाचा वापर करण्यात येतोय. यात WhatsApp ग्रुपवरून आपला मेसेज प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रत्येक पक्षाचा आणि उमेदवारांचा प्रयत्न आहे. पण तुमच्यापर्यंत पोहोचलेला प्रत्येक मेसेज हा अधिकृत असेल असं अजिबात नाही.  

तुम्ही काय काळजी घ्याल :

  • तुमच्याकडे आलेला मेसेज पडताळणी केल्याशिवाय पुढे पाठवू नका.
  • निवडणुकांच्या काळात अनेक आलोभनं देणारे मेसेज फिरत असतात, अश्या मेसेजकडे दुर्लक्ष करा 
  • जर कुणी असे मेसेज मुद्दामून पाठवत असतील तर, त्याला तसं करण्यापासून रोखा
  • कोणत्याही उमेदवाराच्या वैयक्तिक आयुष्यावर काहीही पोस्ट करू नका किंवा असे मेसेज पुढे पाठवू नका


सध्याचा प्रचारात सोशल मिडिया हा एक अतिशय प्रभावी माध्याम म्हणून वापरला जतोय. अशातच आता निवडणूक आयोगाचीही प्रत्येकाच्या सोशल मिडीया अकाउंटवर बारीक नजर असणार आहे. त्यामुळे तुम्ही असं काही पोस्ट करू नका ज्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल किंवा तुम्ही अडचणीत याल.

WebTitle :  marathi news twelve whatsapp admins received notice by election commission

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought : लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांवरील खर्च कमी करा, दुष्काळग्रस्तांना मदत करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन

IND vs WI 1st ODI Live: कुलदीप यादवची 'दादागिरी'! वारंवार संघाबाहेर बसवणाऱ्यांना सडेतोड उत्तर, जस्टीन ग्रीव्ह्सच्या शतकाच्या जोरावर विंडीजची मोठी धावसंख्या

गडचिरोलीतील सूफी संत 'जिलानी सरकार' यांचे निधन; भाविकांमध्ये शोककळा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

SCROLL FOR NEXT