महाराष्ट्र बातम्या

साहित्य संमेलनाचे उद्घाटन; अध्यक्षांच्या खुर्चीत नारळीकरांचे रेखाचित्र

सकाळ डिजिटल टीम

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे उद्घाटनाला उपस्थित राहू शकले नाहीत.

नाशिक - ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे उद्घाटनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत संमेलन अध्यक्षांची खुर्ची रिकामीच होती. त्या खुर्चीवर डॉक्टर जयंत नारळीकरांचे रेखाचित्र ठेवण्यात आले होते.

दरम्यान, संमेलनाचे मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. संमेलनाच्या उद्घाटनावेळी कादंबरीकार विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, जावेद अख्तर, मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार श्रीनिवास पाटील, नागनाथ कोतापल्ले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील होते. याशिवाय डॉ.दादा गोरे, रामचंद्र काळुंखे, कुंडलिक अतकरे, राजमाता शुभांगिनिराजे गायकवाड, विश्वास ठाकूर, जयप्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते.

साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. 3 डिसेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे मात्र उपस्थित राहू शकले नाहीत. संमेलनाच्या आयोजकांकडून नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले. पण नारळीकरांच्या कुटुंबियांनी प्रकृती आणि आताचे वातावरण या पार्श्‍वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT