Sahitya Sammelan 2023 Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sahitya Sammelan 2023 : कुणी पुस्तक घेता का पुस्तक? साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपातच आत्मक्लेश उपोषण

साहित्य संमेलनाचा पहिला दिवसही वादग्रस्त ठरला होता.

सकाळ डिजिटल टीम

वर्ध्यामध्ये कालपासून सुरू झालेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चांगलंच चर्चेत आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी झालेल्या घोषणाबाजीने पहिला दिवस गाजला. तर दुसरा दिवस आत्मक्लेश उपोषणामुळे चर्चेत आला आहे.

साहित्य संमेलनाच्या मुख्य मांडवामध्ये महेश बैसाणे आत्मक्लेश उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आता साहित्य संमेलन चर्चेत आलं आहे. चिकणघर कल्याण इथं १० वी,१२वीच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, महिला- बाल अत्याचारासह अनेक घटकांच्या आणि वैयक्तिक ज्वलंत समस्यांची शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महेश बैसाणे १३ सप्टेंबर २०२२ पासून साडेचार महिन्यांहून अधिक काळ बेमुदत आत्मक्लेश उपोषणाला बसले आहेत. त्यांनी आपली मागणी मांडण्यासाठी मुख्य मंडपामध्ये ठिय्या मांडला आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, दीपक केसरकर यांना बैसाणे यांनी आपल्या मागण्यांची दखल घेण्याचं आवाहन केलं आहे.

तर काल म्हणजे मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संमेलनाची सुरुवात झाली. यावेळी त्यांच्या भाषणादरम्यान, विदर्भवाद्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली. त्यामुळे कालचा दिवसही चांगलाच गाजला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi case: सोनिया गांधींच्या अडचणी वाढणार? दिल्लीच्या कोर्टात आता नवीन तक्रार दाखल!

Onion : मुंबईत २४ रुपये किलोने मिळणार कांदा! केंद्र सरकारची सवलत योजना; फिरत्या वाहनाद्वारे विक्री

Nashik News : छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ

ODI World Cup सुरू होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार क्रिकेटर झाली संघाबाहेर; बदली खेळाडूचीही घोषणा

Manoj Jarange: विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला; भुजबळांना म्हणाले, चर्चेत का सहभागी झाला नाहीत?

SCROLL FOR NEXT