महाराष्ट्र बातम्या

शिवस्मारकावर कोट्यवधी खर्च करा पण... - विश्वास पाटील

सकाळ डिजिटल टीम

कुसुमाग्रजनगरी - ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज झाले. तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर येऊ शकले नाहीत. अध्यक्षांच्या खुर्चीत नारळीकरांचे स्केच ठेवून उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यावेळी कादंबरीकार विश्वास पाटील यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, कन्नड आणि तमिळ भाषांना मिळतोय तर माय मराठीला का मिळू नये, रंगनाथ पठारे यांनी याबाबत अभ्यास केला आहे. मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसंच भाषणात त्यांनी शिवस्मारकाच्या उंचीबाबत सुरु असलेल्या चर्चा हा आक्रस्ताळेपणा आणि अज्ञानातून असल्याचं त्यांनी म्हटलं.

शिवस्मारकाचा विचर करताना आपण स्मारकाच्या उंचीची तुलना स्टॅच्यू ऑफ लिबर्टीशी करतो. आपण उठसूठ अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेचा विचार करतो. त्या उंचीएवढी उंची असायला हवी असं आपण म्हणतो. हा आक्रस्ताळेपणा आणि अज्ञान आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे १८६५ चं यादवी युद्ध होतं. त्याच्याआधी २०० वर्षे शिवरायांची कहाणी आहे. शिवरायांचं राज्य छोटं होतं पण त्यांच्या कर्तृत्वाची प्रभा ही फिरंग्यांच्या कागदपत्रांत आढळेल. काळानेसुद्धा याच्या नोंदी घेतल्या आहेत असंही विश्वास पाटील म्हणाले.

शिवस्मारकावर कोट्यावधी रुपये खर्च करा. त्याला ना नाही. पण सह्याद्रीच्या् अंगाखांद्यावर आहे ते जपायला हवं असंही विश्वास पाटील यांनी म्हटलं. ते म्हणाले की, शिवस्मारकावर हजारो कोटी खर्च करण्यावर आमची हरकत नाही पण सह्याद्रीच्या स्मृती जपण्याचं आपलं काम आहे. राजापुरची वखारीची दुरावस्था झाली. राजापुरच्या वखारीचा इतिहास आहे. आता पुढच्या पिढीला कसं सांगणार की आमच्या राजासमोर ब्रिटिश, पोर्तुगिज धडपडत होते. अगदी किरकोळ कारणाने खुणा नष्ट होतायत. राजापुरची वखार होती, रस्त्याच्या पलिकडे पोलिसांची कॉलनी होती, ती खंडराजवळ जायची, भुताखेताची भीती वाटायची म्हणून ते स्मारक तोडलं. असं पाहता येणार नाही, किल्ल्याचं रक्षण करणं गरजेचं असल्याची भावना विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Pune University Fake Degree: पुणे विद्यापीठातील बनावट बी.कॉम. पदवी प्रकरणात कर्मचारी रमेश मुखेकर ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत

Pune Voter List Revision: पुण्यात मतदार यादी पुनरीक्षणाचे फक्त ५५ टक्के काम; आठ दिवसांत उर्वरित ४५ टक्के पूर्ण करण्याचे प्रशासनास आव्हान

Vande Mataram: ''राजेंद्र प्रसाद यांनी मोठी चूक केलेली'', वंदे मातरम् बिल मंजूर झाल्यानंतर खासदार ओवैसींचं वादग्रस्त विधान

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

SCROLL FOR NEXT