महाराष्ट्र बातम्या

Marathwada Crime: संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर केला सावत्र बापाने अत्याचार!

Latest Crime News: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ४७ वर्षीय नराधम पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Latest Sambhajinagar News: देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जनक्षोभ असताना छत्रपती संभाजीनगरातही अशीच संतापजनक घटना उघडकीस आली. एका सावत्र पित्याने आपल्या सोळा वर्षीय मुलीवर तब्बल सात महिने अत्याचार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ४७ वर्षीय नराधम पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ३० ऑगस्ट २०१२ मध्ये पीडितेच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यामुळे पीडितेच्या आईने वर्ष २०१६ मध्ये नराधमाशी लग्न केले. चार वर्षांपासून पीडिता ही आई, नराधम सावत्र वडील व भावाबरोबर राहते. नराधम हा एका रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून कामाला आहे.

जानेवारीत पीडिता ही शाळेतून घरी आली, जेवण करून झोपली होती. घरी एकट्या पीडितेवर नराधम पित्याने अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला व तुझ्या आईला घरातून हाकलून लावीन, अशी धमकी दिली. घाबरलेल्या पीडितेने याबाबत वाच्यता केली नाही. त्यानंतर आरोपीने पुन्हा १८ जुलै रोजी पीडितेवर अत्याचार केला.

पीडितेला मासिक पाळी येत नसल्याने व वारंवार पोट दुखत असल्याने तिच्या आईने चौकशी केली व तिला विश्वासात घेतले. त्यावेळी पीडितेने वरील घटना सांगितली. २८ ऑगस्ट रोजी पीडितेच्या आईने तिला एका खासगी रुग्णालयात आणले, सोनोग्राफीत पीडिता आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. प्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली.

आरोपीला बापाला पोलिस कोठडी

आरोपीला गुरुवारी (ता. २९) न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सहायक लोकाभियोक्ता ज्ञानेश्वरी नागुला-डोली यांनी युक्तिवाद केला. पीडितेच्या पोटातील अर्भकाची तसेच आरोपीचीही डीएनए चाचणी आवश्यक आहे. त्यामुळे दोघांचीही वैद्यकीय तपासणी करायची असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सुनावणीनंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वैरागडे यांनी आरोपीला ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT