Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update : राज्यात येत्या दोन दिवसात या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झोडपणार; काळजी घेण्याचे आवाहन

रोहित कणसे

बंगालच्या उपसागरात आलेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांना मोठा तडाखा दिला आहे. चेन्नईत मुसळधार पावसामुळे पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. या चक्रीवादळाचा परीणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळत असून येत्या ४८ तासांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिचॉन्ग वादळामुळे राज्यात देखील पावसाची परिस्थिती तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे, हवामान खात्याने राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आज आणि उद्या पावसाचा इशारा दिला आङे. विदर्भ, मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. गुरुवारी पूर्व विदर्भात, तर शुक्रवारी मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT