Jainism esakal
महाराष्ट्र बातम्या

Jainism : वाशिममध्ये पुन्हा दिगंबर जैन रस्त्यावर; श्वेतांबर-दिगंबरांचा नेमका वाद काय?

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः महिन्याभरापूर्वी वाशिम जिल्ह्यातल्या शिरपूर येथे श्वेतांबर जैन आणि दिगंबर जैन एकमेकांना भिडले होते. आज दिगंबर जैन समाजाच्या वतीने मौन रॅली काढण्यात आलेली आहे. याबाबत मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.

मागच्या महिन्यात काय घडलं?

11 मार्च रोजी मंदिर उघडल्यानंतर भगवान पार्श्वनाथ मूर्तीच्या लेप करण्याच्या प्रक्रियेसाठी दिगंबर व श्वेतांबर पंथीयांमध्ये एकमत होत नसल्याने मोठे वादंग निर्माण होत आहे. रविवारी दिनांक 19 मार्च रोजी श्वेतांबर समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता गावामधून रॅलीचे आयोजन केले होते.

हेही वाचाः Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सदर रॅली मंदिरापासून निघाल्यानंतर परत येताना पोलिसांनी नेमून दिलेला मार्ग बदलून रॅली दिगंबर समाजाचे निकलंक निकेतन भवन समोर आली. त्यावेळी जमावाने चिथावणीखोर घोषणाबाजी, शिवीगाळ, धक्काबुक्की, दगडफेक, चप्पल फेक, खुर्च्या फेक जे हातात मिळेल ते एकमेकांच्या अंगावर फेकण्यात आले. असा प्रकार बेकाबू जमावाणे केला. दोन्ही पंथ एकमेकांसमोर आमने-सामने आले होते. 19 मार्च रोजी घडलेल्या हाणामारीच्या प्रकरणांमध्ये एकूण 18 व्यक्तींवर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले होते.

मात्र हा वाद मिटलेला नाही. शिरपूर येथील मूर्ती लेपन प्रकरणावरुन आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर दिगंबर पंथीयांनी मोर्चा काढला. श्वेतांबरांकडून मूर्ती लेपन प्रक्रिया पारदर्शक होत नाही, असा दिगंबरांचा आरोप आहे. शिवाय जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य होत नाही, लेपन प्रक्रियेमुळे मूर्तीचं मूळ स्वरुप बदलत असल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे.

दरम्यान, जैन समाजाच्या दिगंबर पंथीयांचा मोर्चा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ थांबवला. पाच जणांना निवेदन देण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी प्रशासनाकडे मागण्यांचं निवेदन देण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिरपूर येथे श्वेतांबर जैन आणि दिगंबर जैन यांच्या संघर्ष दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासल्या नाहीत तर Claimच्या वेळी बसू शकतो मोठा धक्का!

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर कर्जतला पहाटे दाट धुक्याची चादर; आल्हाददायक वातावरणाने नागरिक सुखावले

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT