Coastal Road Project  sakal
महाराष्ट्र बातम्या

Coastal Road Project : कोस्टल रोडमुळे मरिन ड्राइव्ह ते वरळी नऊ मिनिटांत!

महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचा दुसरा मोठा बोगदा सोमवारपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे मरिन ड्राइव्हहून वरळीपर्यंतचा ४० मिनिटांचा प्रवास अवघ्या आठ ते नऊ मिनिटांत होणार आहे. संपूर्ण प्रकल्पावर सुमारे १४ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचा दुसरा मोठा बोगदा सोमवारपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे मरिन ड्राइव्हहून वरळीपर्यंतचा ४० मिनिटांचा प्रवास अवघ्या आठ ते नऊ मिनिटांत होणार आहे. संपूर्ण प्रकल्पावर सुमारे १४ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पाहणीनंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा मार्ग सोमवार ते शुक्रवार असे आठवड्याचे पाच दिवस सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला राहणार आहे; तर कोस्टल रोडचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शनिवारी व रविवारी हा मार्ग बंद ठेवणार आहे.

कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरिन ड्राइव्ह हा नऊ किमीचा बोगदा १२ मार्च रोजी सुरू करण्यात आला आहे. आता मरिन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंत ६.२५ किमीचा मार्गही सुरू झाला आहे. १०.५८ किमीचा कोस्टल रोड आणि ४.५ किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडणारे दोन्ही गर्डर बसविले आहेत. त्यामुळे लवकरच वांद्र्याहून-दक्षिण मुंबई असा पाऊण तासाचा प्रवास बारा मिनिटांत करता येणे शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Kuldeep Yadav: एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर! नोंदवली सर्वोत्तम कामगिरी

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

SCROLL FOR NEXT