solapur crime

 

Canva

महाराष्ट्र बातम्या

विवाहितेला नांदवायला नकार! ‘ट्रॅक्टर, फॉर्च्युनर द्या, नाहीतर मुलाचा दुसरा विवाह करू’ सासरच्यांकडून धमकी; विवाहितेची सासरच्यांविरुद्ध पोलिसांत धाव

‘आम्ही आमच्या मुलीच्या लग्नात तिला २१ तोळे दागिने घातले. तुझ्या आई-वडिलांनी आमच्या सांगण्याप्रमाणे दागिने घातले नाहीत. आता शेतीत ट्रॅक्टर व फिरायला कार, फॉर्च्युनर गाडी द्या, नाहीतर तुमच्या मुलीला नांदवणार नाही’ असे म्हणून छळ केल्याची फिर्याद विवाहितेने पोलिसांत दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : ‘आम्ही आमच्या मुलीच्या लग्नात तिला २१ तोळे दागिने घातले. तुझ्या आई-वडिलांनी आमच्या सांगण्याप्रमाणे दागिने घातले नाहीत. आता शेतीत ट्रॅक्टर व फिरायला कार, फॉर्च्युनर गाडी द्या, नाहीतर तुमच्या मुलीला नांदवणार नाही’ असे म्हणून छळ केल्याची फिर्याद विवाहितेने पोलिसांत दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये फिर्यादी श्रृती लक्ष्मण पुजारी हिचा विवाह लक्ष्मण पुजारी याच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. विवाहानंतर आता विवाहितेच्या सासरच्यांनी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये, शेती कामासाठी ट्रॅक्टर, फिरायला कार, फॉर्च्युनर आण म्हणून छळ सुरू केला. विवाहात आमचा मानपान चांगला केला नाही. तू आमच्या घरात नांदण्याच्या व राहण्याच्या लायकीची नाही म्हणूनही शिवीगाळ केली.

आम्ही मागणी केलेल्या वस्तू, पैसे, दागिने नाही दिले तर आम्ही तुमच्या मुलीला नांदवणार नाही. आमच्या मुलाचा दुसरा विवाह लावून देऊ, असे म्हणून त्यांनी माझ्या आई-वडिलांना दमदाटी केली. माहेरी येऊन शिवीगाळ करून त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

अगोदर भरोसा सेलकडे अर्ज, पण...

पोलिसांत फिर्याद देण्यापूर्वी विवाहितेने सोलापूर शहर पोलिसांच्या महिला कक्षाकडे (भरोसा सेल) तक्रार केली होती. पण त्याठिकाणी त्यांचे भांडण मिटले नाही. त्यानंतर श्रृती पुजारी यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यावरून विवाहितेचा पती लक्ष्मण, सासू सिद्धव्वा, सासरा सुरेश व नणंद दीपा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी उद्या (सोमवारी) गुन्हा दाखल झालेल्या विवाहितेच्या पतीसह त्याच्या आई-वडिलांना चौकशीसाठी बोलावले आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप भालशंकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईहून दुबईला निघालेलं विमान, उतरण्याआधी आला मिसाइल अलर्ट; हवेतच 'डबल रिवर्स'ची दुर्मिळ घटना, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : विशाखा सुभेदारांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला

Wani Crime : धक्कादायक! लग्नासाठी मुलीला कुटुंबाच्या खुनाची धमकी; भाजप जिल्हाध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल

Kolhapur Tragic Incident : घरात कोणालाही आपल्या मनातलं सांगितलं नाही, बारावीच्या विद्यार्थ्यांने थेट उचललं टोकाचं पाऊल

Horscope : भाग्यशाली बुधवार! उद्या 'या' चार राशींच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट; अचानक मिळणार पैसे, अडकलेले काम होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT