Messey Ferguson Tafe
Messey Ferguson Tafe Sakal
महाराष्ट्र

Messey Ferguson Tafe : 'टैफ'ने लाँच केला जागतिक दर्जाचा ट्रॅक्टर, फिचर्स, किंमत संपूर्ण माहिती एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : जगातल्या तिसरी सर्वांत मोठी ट्रॅक्टर कंपनी असलेल्या मैसी फर्ग्यूसन ट्रॅक्टरचे निर्माते टैफे - ट्रैक्टर्स एंड फार्म इक्विपमेंट लिमिटेड ने कोल्हापुर मध्ये एका भव्य समारोहामध्ये क्रांतिकारी मैग्नाट्रैक सीरीज लॉन्च केली.

त्यासोबत मैसीने ट्रॅक्टर उद्योगामध्ये एक नवा मापदंड स्थापित केला. नवा मैसी फर्ग्यूसन 8055 मैग्नाट्रैक हा 50 hp रेंज मध्ये येतो आणि मैग्नाट्रैक सीरीजमधील पहिला ट्रॅक्टर आहे.

मैग्नाट्रैक सीरीज ही विश्व स्तरीय स्टाइल, उन्नत टेकनॉलॉजी, बेजोड शक्ती, कमी ऑपरेटिंग खर्चामध्ये चांगली गुणवत्ता प्रदान करते. हा ट्रॅक्टर अवजड मालवाहतुकीसाठी सर्वोत्तम आहे.

मैग्नाट्रैक सीरीज लाँच करतांना, टैफे च्या CMD मल्लिका श्रीनिवासन यांनी सांगितले की, "टैफे आणि मैसी फर्ग्यूसन ब्रांड ने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसोबत 60 वर्षा पेक्षा अधिक काळापासून मजबूत संबंध बनवले आहेत.

महाराष्ट्रातील शेतकरी खूप प्रगतशील आहेत, जे उत्पादकता वाढविण्यासाठी आणि कृषी कार्यामध्ये चांगले मूल्य प्राप्त करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत. ताकत, स्टाइल, आराम आणि कार्यक्षमतेची पूर्तता करण्यासाठी टैफेनी आज नवीन मैग्नाट्रैक सिरीज लाँच केली आहे.

आम्ही भारताच्या ऊस उत्पादन करणाऱ्या राजधानी मध्ये, म्हणजेच कोल्हापूर मध्ये, हेवीड्यूटी मालवाहतूक करणारा प्रिमियम ट्रॅक्टर - मैग्नाट्रैक लाँच करत आहोत, ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे.” असं श्रीनिवासन म्हणाले.

उत्कृष्ट दर्जाच्या मैग्नाटॉर्क इंजिनसह तयार असलेला हा प्रिमियम माल वाहतुकीचा ट्रॅक्टर अधिक टॉर्क आणि उच्च इंधन कार्यक्षमता प्रदान करतो. आपल्या श्रेणी मध्ये सर्वश्रेष्ठ 200 Nm च्या उच्च टॉर्क सोबत हा ट्रॅक्टर सहजपणे ओबडधोबड आणि कुठल्याही परिस्थिती मध्ये अवजड ट्रॉलीला आरामात ओढू शकतो.

रस्त्यावर जास्त स्पीडसह विलक्षण उत्पादकता देण्यासाठी ट्रॅक्टरचे इंजिन आणि ट्रान्समिशन हे चांगल्या प्रकारे सुसंगत केलेले आहेत. आणि यामुळे इंधनाची बचत आणि जास्त वेगाने ट्रॅक्टर मालवाहतूक करू शकतो.

विश्वस्तरीय स्टाइलिंग आणि डिजाइन ही मैग्नेटट्रैक सिरीजला “ट्रॅक्टरांचा बॉस ” बनवते, अत्याधुनिक मैग्ना स्टाइलिंग मध्ये अत्याधुनिक फीचर्स आहेत, ज्यामध्ये वन-टच फ्रंट ओपनिंग सिस्टमसह एरोडायनामिक सिंगल-पीस बोनट समाविष्ट आहे.

प्रशस्त प्लेटफॉर्म, स्टायलिश लुक, आधुनिक स्टीयरिंग व्हील आणि एडजस्टेबल सीट हे ऑपरेटिंग आरामाचे मानक चिन्हांकित करतात. इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच, मैसी फर्ग्यूसन 8055 मध्ये रात्रीच्या वेळी चांगल्या प्रकाशासाठी ट्राई-LED च्या सोबत शक्तिशाली प्रोजेक्टर हेडलैम्प समाविष्ठ केला आहे.

ऊस वाहतूक, बांधकाम माल किंवा हेवीड्यूटी माल वाहतुकीसाठी सगळ्यात उपयुक्त, मैग्नाट्रैक सीरीज विविध प्रकारच्या कृषि संबंधित कार्यंसाठी पण उपयुक्त आहे. यामध्ये रिवर्सिबल मोल्डबोर्ड प्लो (RMB), रोटावेटर, पोस्ट-होल डिगर, थ्रेशर आणि बेलर जसे नवीन कृषी यंत्र सामील आहेत.

मैग्नाट्रैकचा हाई ग्राउंड क्लीयरेंस हा बंधारे आणि खड्ड्याचे रस्ते ओलांडताना ट्रॅक्टरला मदद प्रदान करतो. याचा लांब व्हीलबेस स्थिरता सुनिश्चित करतो आणि अवजड माल ओढाताना फ्रंट लिफ्टिंग ला थांबवतो. हाई PTO प्लेसमेंट PTO संचालित उपकरणामध्ये विस्तृत विविधतेसोबत उत्तम परफॉरमेंस देते.

मॅक्स ऑइल इमर्स्ड ब्रेक्स (OIB) ब्रेकसह ड्युराकूल ब्रेक्स स्लोप असिस्ट सिस्टम (SAS) पर्यायी 16.9RT सह आणि रेडिएटर आणि सायलेन्सरसाठी सुरक्षा रक्षक पुढे मॅग्नाट्रॅकला एक अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह ट्रॅक्टर बनवतात. मैग्नाट्रैकची उपयुक्त आणि नवे फीचर्स प्रगत तंत्रज्ञान आणि सहज अनुभव प्रदान करतात, जे भारतीय जमीनीसाठी अनुकूल आहेत.

या ट्रॅक्टर सिरीजची वैशिष्ट्ये

  • ऊस वाहतूक, बांधकाम मालाची वाहतूक इत्यादी सारख्या जड वाहतूक कार्यासाठी उत्कृष्ट

  • हेवीड्यूटी माल वाहतुकीसाठी उच्च टॉर्क इंजिन, कमी ऑपरेटिंग कॉस्ट, आंतरराष्ट्रीय स्टाइलिंग आणि उत्तम सोयीस्कर डिझाइन

  • रिवर्सिबल मोल्डबोर्ड प्लो, बेलर आणि थ्रेशर सारख्या विविध कृषि कार्य साठी उपयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT