किशोरी पेडणेकर sakal
महाराष्ट्र बातम्या

राजकीय पक्षांच्या आडूनच पत्राचे धाडस, महापौर पेडणेकर कडाडल्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबईच्या (mumbai) महापौर किशोरी पेडणेकर (mayor kisori pednekar) यांना धमकीचं पत्र देण्यात आलं. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. हे पत्र कुणी पाठवले आहे. याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.

''राजकीय पक्षांच्या आडून पत्राचे धाडस''

भाजपने माझ्या पत्रावर उलट उत्तर दिली आहेत. न्यायालय आणि संविधानाला आपण म्हणतो. माझी खंत जिथे मांडायला हवी तिथे मांडली. कुटुंबप्रमुख प्रमाणे मुख्यमंत्री आम्हाला सांभाळतात तेही यावर प्रचंड चिडले आहेत. महिलांचा आदर करा असं सांगत आपल्या मोठ्या लोकांच्या विचारातून आम्ही घडलो. बाळासाहेबांचे विचार आणि संस्कार आमच्यात आहे.

आई म्हणून हळवी झाले. मी शिवसेनेची रणरागिणी आहे, मला काही झालं तरी हरकत नाही. आम्हाला ऊर्जा देणारी कवचकुंडले आहे. मला पाठींबा देणारे माझे पती आणि मुलगा यांच्या बाबत केलेलं हे विधान आहे. कोणीतरी क्रूरकर्मा असावा ज्याने राजकीय पक्षांच्या आडून पत्राचे धाडस केले असे महापौर म्हणाल्या.

गृहमंत्र्यांकडून दखल

वरळीत झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याविरोधात अपशब्द वापरला होता. त्यानंतर आता महापौरांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र समोर आल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर खुद्ध गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांना जीवे मारण्याच्या धमकीची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून त्यांना व कुटुंबीयांना कडेकोट पोलीस संरक्षण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापौरांना अश्लाघ्य भाषेत धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याला कठोर शासन केले जाईल’ अशी ग्वाही दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT