Mazi Ladki Bahin Yojana esakal
महाराष्ट्र बातम्या

Ladki Bahin Yojana: अगं बाई अरेच्चा... 1500 येणार होते आला 1 रुपया, नेमका काय विषय झाला? महिला व बालकल्याण मंत्र्यांच स्पष्टीकरण

Mazi Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी हे पैसे मिळणार आहेत.

Sandip Kapde

लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरु झाल्यापासून अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाखांहून अधिक अर्ज सादर झाले आहेत. यातील १ कोटी ३० लाख अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले असून, ५० लाख अर्ज ऑफलाइन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. राज्यातील २ कोटी ते २.५ कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरतील असा अंदाज आहे.

तांत्रिक पडताळणीसाठी १ रुपया

महिलांच्या खात्यात थेट ३ हजार पाठवण्यापूर्वी सरकार १ रुपया पाठवणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. सरकार १५०० रुपये महिना देणार होते तर खात्यात १ रुपया कसा आला, असा प्रश्न महिलांनी विचारला यावर आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात १ रुपया जमा करणार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. हा १ रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अर्जांची प्रक्रिया आणि पैसे जमा होण्याची वेळ

लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी हे पैसे मिळणार आहेत. अर्ज केलेल्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याबँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट २०२४ रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३,००० रुपये जमा होणार आहेत.

अपप्रचार आणि गैरसमज यांबाबत स्पष्टीकरण

राज्यातील माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर "In Pending To Submitted" असा पर्याय दिसत असल्यास घाबरू नये, हे म्हणजे अर्ज सबमिट झाला आहे आणि आता वरिष्ट पातळीवर अधिकारी अर्जाची पडताळणी करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Fuel Saving Appeal : PM मोदींच्या 'इंधन बचती'च्या सल्ल्याला घरचा आहेर? 500 गाड्यांचा ताफा काढून भाजप नेत्याचे शक्तिप्रदर्शन!

Virat Kohli ने ज्या मॉडेलची पोस्ट लाईक केली होती, तिचा खळबळजनक दावा; म्हणाली, 'मला पैशांचं आमिष दाखवलं'

Mumbai News: पालिका शाळेत संविधानाचे धडे, शिक्षण समितीसमोर अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरण, १६ संशयित आरोपी तपास यंत्रणांच्या ताब्यात

Navi Mumbai: नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा कपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT