MBBS Student esakal
महाराष्ट्र बातम्या

MBBS Student: देशात राहून विदेशात एमबीबीएस शिक्षणाचे आमिष; भारतात बोगस संस्थामध्ये प्रवेश देणारे 'रॅकेट'समोर

विद्यार्थ्यांची फसवणूक

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: पालकांमध्ये विद्यार्थ्यांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळावा यासाठी मोठी स्पर्धा असते. त्यासाठी आपल्या आयुष्यभराची कमाई ते पाल्याच्या शिक्षणावर लावण्यासाठी तयार असतात.

त्याचा फायदा घेत अनेक एजंट विदेशातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचे आमिष दाखवित, त्यातून भारतातील बोगस संस्थांमध्ये प्रवेश घेत फसवणूक करीत असल्याचे ‘रॅकेट’समोर आले आहे.

या रॅकेटच्या माध्यमातून ‘नीट’ नसतानाही विद्यार्थ्यांना प्रवेशाचे आमिष देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजेन्सीच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ घेण्यात येते. इंडियन मेडिकल कौन्सिलच्या दिशानिर्देशानुसार त्यात उत्तीर्ण झाल्याशिवाय प्रवेश मिळत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, विदेशातही प्रवेश मिळविण्यासाठी ‘नीट’ अनिवार्य करण्यात आलेली आहे. शिवाय मेडिकल कौन्सिलने विदेशात प्रवेशासाठी खास दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यामध्ये विदेशात प्रवेश घेत असताना, त्या ठिकाणी राहून लेखी अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि आतंरवासिता (इंटर्नशिप) करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ती परीक्षा दिल्यानंतर भारतात परत येण्यासाठीही कौन्सिलद्वारे तयार केलेल्या अभ्यासक्रमाची परीक्षा पूर्ण केल्यावरच त्याला येथे प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळत असते.

मात्र, असे असताना, काही संस्थांद्वारे विदेशातील विद्यापीठात असलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमांशी ‘टायअप’ असल्याची बतावणी करीत, विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळवितात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात एजंट सक्रीय असल्याचे समजते.

यावेळी ते देशातील काही बोगस संस्थांमध्ये प्रवेश मिळवित, त्यांना काही काळ येथे आणि काही काळ विदेशात परीक्षेसाठी पाठवित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत अनेक पालकांनी पोलिसांत तक्रारही देशात राहून विदेशात एमबीबीएस शिक्षणाचे आमिष नोंदविली आहे. मात्र, पैसे न मिळण्याच्या भीतीने पालकही समोर येत नसल्याचे चित्र आहे.

पासपोर्टमधून होते माहिती उघड

विदेशात प्रवेश घेतल्यावर तिथेच राहावे लागत असताना असे विद्यार्थी येथेच असल्याची त्याची नोंद त्यात होत असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला तरीही त्याची पदवी ही ग्राह्य धरली जात नाही.

कारण नियमानुसार कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेतलेला विद्यार्थी त्याच महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि इंटर्नशिप करणे बंधनकारक आहे. हे पासपोर्टची तपासणी केल्यावर उघड होते.

विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक आणि शैक्षणिक नुकसान

एमबीबीएससाठी महाविद्यालयाचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च हा जवळपास एक कोटी रुपयांपेक्षा अधिक येतो. त्यामुळे इतका खर्च पालकांना झेपणारा नसल्याने एजंट त्यांना हेरून केवळ अर्ध्या पैशात विदेशातून एमबीबीएसमध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवितो.

त्या आमिषाला बळी पडत विदेशातील महाविद्यालयाच्या नावावर देशातील टायअप असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेतात. मात्र, मेडिकल कौन्सिलचा नियमाची माहिती पडताच, ते प्रवेश रद्द करण्यासाठी संस्थेकडे जाताच, त्यांना फसवणूक झाल्याचे कळते. त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होते. अशी अनेकांची त्यातून फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

विदेशात प्रवेशासाठी हे आहेत दिशानिर्देश ‘नीट’ शिवाय प्रवेश मिळत नसल्याने ती परीक्षा अनिवार्य आहे.

विदेशात इंग्रजीतून शिक्षण घ्यावे.

कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेतलेला विद्यार्थी त्याच महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि इंटर्नशिप करणे बंधनकारक आहे. परदेशातून अभ्यासक्रम पूर्ण करतानाही हात नियम लागू पडतो. ज्या देशात प्रवेश घेतला, तेथील परवाना मिळणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT