Medical Course esakal
महाराष्ट्र बातम्या

Medical Course : राज्यातील वैद्यकीयच्या १००० जागा वाढल्या

राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश संख्या आता एक हजारने वाढली आहे. एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांच्या अनुक्रमे ९०० व १०० जागा पुन्हा वाढल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश संख्या आता एक हजारने वाढली आहे. एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांच्या अनुक्रमे ९०० व १०० जागा पुन्हा वाढल्या आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आठ संस्थांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता नसल्याने अचानक त्यांची नावे वगळण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या फेरीत त्यांचा समावेश नव्हता. आता या संस्थांना मान्यता मिळाल्याने दुसऱ्या फेरीसाठी हजार जागा पुन्हा वाढल्या आहेत.

नीट युजी २०२३ एमबीबीएस किंवा बीडीएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी जागांची माहिती ३१ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेतील एमबीबीएसच्या १०० जागांसह इतर सात खासगी संस्थांमधील ९०० जागांचाही प्रवेशासाठी समावेश करण्यात आला होता.

मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाविद्यालयांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता प्राप्त झाली नव्हती. मान्यता नसल्याने आठ संस्थांना प्रथम प्रवेश फेरीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या फेरीतून एमबीबीएसच्या ९०० आणि बीडीएसच्या १०० जागा कमी झाल्या. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून या महाविद्यालयांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता प्राप्त झाली असल्यामुळे सदर महाविद्यालयांचा समावेश दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये करण्यात येणार आहे.

राज्यातील एमबीबीएसच्या जागा

- महाविद्यालये - ३२

- सरकारी जागा - ५ हजार २००

- खासगी महाविद्यालयांतील जागा - ३ हजार ७०

- एकूण - ८ हजार २७०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: भाजप आमदारांच्या गाडीचा अपघात! दुचाकीची कारला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर; नेमकं काय घडलं?

Gangapur Crime : अवैध वाळू व अवैध मुरूम उपसा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT