तात्याराव लहाने  File photo
महाराष्ट्र बातम्या

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने सेवानिवृत्त

नामदेव कुंभार

मुंबई : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने 36 वर्षांच्या शासकीय सेवेनंतर बुधवारी सेवानिवृत्त झाले. या पदासाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी यासाठी डॉ. लहाने यांनी प्रयत्न केले होते, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे मंत्री अमित देशमुख यांच्याबरोबर मंत्रालयात नुकतीच दीर्घकाळ चर्चा झाली. पण देशमुख यांनी डॉ. लहाने यांना मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर त्यांना बुधवारी सेवानिवृत्त करण्यात आल्याची अधिसूचना जारी करण्यात आली. रुग्णांसाठी धावून जाणारा डॉक्टर अशी तात्याराव लहाने यांची राज्यभर ख्याती आहे. ‘डोळ्याचे डॉक्टर म्हणजे लहाने’ अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे.

जे.जे. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने गेली ३६ वर्षे वैद्यकीय सेवेत रुजू होते. मागील दोन वर्षांपासून ते वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. या पदासाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी यासाठी डॉ. लहाने यांनी मागील काही दिवसांपासून अनेक मंत्र्यांना संपर्क साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही याबाबत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतल्याचे सांगण्यात येते. संचालनालयाचे रिक्त झालेले पद ‘एमपीएससी’च्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

तात्याराव लहाने यांनी 1985 मध्ये बीडमध्ये अधिव्याख्याता शासकीय सेवेत रुजू झाले होते. आठ वर्ष बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंधत्व आलेल्यांना दृष्टी देण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही त्यांनी सेवा दिली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात १९९४ ला रुजू झाले होते. मागील 25 वर्षांपासून ग्रामीण, दुर्गम भागांत नेत्रशिबिरे आयोजित करण्याचे कार्य डॉ. लहाने यांनी अविरतपणे केले आहे. जे. जे. रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत असताना रुग्णालयामध्ये कार्यालयीन इमारत, गरजू रुग्णांसाठी धर्मशाळा बांधण्यात आल्या. लहाने यांना पद्माश्री पुरस्कारासह ५००हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT