medical exam 
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकींग ! वैद्यकीय परीक्षा 15 जुलै पासूनच; विद्यार्थ्यांना गावातच देता येणार परीक्षा 

तात्या लांडगे

सोलापूर : वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचे नियोजन झाले आहे. कोरोनाच्या संसर्गात विद्यार्थ्यांची सुरक्षितता म्हणून यंदा लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयातच घेतल्या जाणार आहेत. तर दुसरा पर्याय म्हणून विद्यार्थी असलेल्या त्यांच्या गावानजीकच्या परीक्षा केंद्रांवरही परीक्षा घेण्याची सोय केली जाईल, असे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.


केंद्रीय परिषदांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार उन्हाळी 2020 वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचे (प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रम 2019 वगळून) विद्यापीठाने जाहीर केले आहे. यासंबंधीचे अभ्यासक्रम निहाय वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार असल्याचेही विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. ए. जी. पाठक यांनी सांगितले. दरम्यान परीक्षार्थी व महाविद्यालयांच्या सोयीसाठी ही परीक्षा टप्प्याटप्प्याने घेतली जाणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच कोरोनाच्या संसर्ग काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय करण्याच्या अनुषंगाने विद्यार्थी ज्या महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत, त्याच ठिकाणी त्यांची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


परीक्षा नियंत्रक डॉ. पाठक म्हणाले...

  • केंद्रीय परिषदांचे निर्देश आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार 15 जुलैपासून सुरू होणार वैद्यकीय परीक्षा
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयात होणार त्यांची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा
  • विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाजवळील अभ्यासक्रमाच्या परीक्षा केंद्रांवरही परीक्षा देण्याची केले जाईल सोय
  • विद्याशाखा व जिल्हानिहाय परीक्षा केंद्रांची यादी आठ ते दहा दिवसांमध्ये विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल
  • कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा विद्यार्थ्यांना बदलता येणार त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र 

गावातच अथवा शिकत असलेल्या महाविद्यालयात देता येणार परीक्षा

कोरोना या विषाणूच्या संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचे निश्चित केले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता म्हणून विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. तर विद्यार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा त्यांच्या गावानजीक असलेल्या परीक्षा केंद्रांवरही देता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

- डॉ. ए. जी. पाठक, परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today: रशिया-अमेरिकेत डिझेल महागले; भारतात पेट्रोल-डिझेलचे दर किती? पाहा ताजे रेट

Maharashtra Drought Survey : दुष्काळी पंचनामे आजपासून; चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती

UPI MDR Charges : 15 सप्टेंबरच्या निर्णयानंतर UPI पेमेंटवर MDR शुल्क; PhonePe-Google Payच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता

गोविंदा कोमल रानीसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला, नेटकरी चिडले! 'सुनीताजींना आणायला हवं होतं'

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

SCROLL FOR NEXT