Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट रद्द

उदय सामंत यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे भेट रद्द झाल्याची माहिती

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची आजची भेट रद्द झाली आहे. उदय सामंत यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे भेट रद्द झाल्याची माहिती आहे. बारसू रिफायनरी प्रकरणी भेटीला विशेष महत्त्व आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट रद्द झाली आहे. उदय सामंत यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे भेट रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बारसू रिफायनरी प्रकरणी भेटीला विशेष महत्त्व आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची आज भेट होणार होती. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये काल फोनवही चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांची आज प्रत्यक्ष भेट होणार असल्याची माहिती समोर आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांची आज सकाळी 10 वाजता भेट होणार होती. या भेटीमध्ये बारसू आंदोलनाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पवार आणि सामंत यांच्यात फोनवर याचविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली.

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी काल सर्व्हेक्षण सुरु झालं. पण या सर्व्हेक्षणाला काही स्थानिकांनी विरोध केला. विशेष म्हणजे काही महिला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलं. या प्रकरणावर शरद पवार यांनी भूमिका मांडली होती.

“राज्यात उद्योग वाढीस लागायला हवा. मात्र उद्योग ज्या ठिकाणी उभारणार आहेत त्याठिकाणच्या स्थानिकांचे मत देखील विचारात घ्यायला हवे. सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन विषय सोडवावा, अशी भूमिका शरद पवार यांनी या प्रकरणावर मांडली आहे. त्यानंतर आज उदय सामंत आणि शरद पवार यांची भेट होती.

२५ महिलांना अटक

कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. यादरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन करणाऱ्या २५ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या महिलांवर सौम्य लाठीचार्ज केला.

मात्र यानंतर देखील आंदोलनकर्ते आपल्या मतावर ठाम आहेत. राजापूरमधील महिलेने 'जीव गेला तरी इथेच थांबेन' असा इशारा दिला आहे. कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी 'रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग' प्रस्तावित आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT