Meeting at Tuesday against the background of agitation over milk price in Maharashtra 
महाराष्ट्र बातम्या

दूध दर आंदोलनाबाबत उद्या मंत्रालयात बैठक.... काय होणार चर्चा?

अशोक मुरुमकर

अहमदनगर : दूध दरावरुन महाराष्ट्रात आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत. आज नगर जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दगडाला दुधाने अभिषेक घालून सरकारचा निषेध करत आंदोलनाला सुरुवात केली. कोल्हापूर व सांगलीतही असे आंदोलन केले जात असल्याचे समितीचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवर करण्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली असून मंगळवारी यासंर्भात बैठक बोलावली आसून यामध्ये नेमके काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले म्हणाले, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या. दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करावे, या प्रमुख मागण्यासाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्याचे केले नियोजन. कोल्हापूर व सांगलीतही असे आंदोलन केले जात आहे. दरम्यान दुधाचे दर घटल्यामुळे दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलावली आहे.


राज्यात चार महिन्यांपासून ‘कोरोना’मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याने दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे, अशी मागणी करत आहेत. या विविध समस्यांच्या अनुषंगाने शेतकरी आणि दूध संघाचे प्रश्न समजावून घेऊन त्यावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात दुपारी दोन वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला महानंदचे अध्यक्ष, दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, विविध शेतकरी संघटनेचे प्रमुख, तसेच राज्यभरातील  विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक उपस्थित राहणार आहेत.

नगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने आज आंदोलनाला सुरुवात केली आहे. दुधाला 30 रुपये भाव द्या, यासह केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या. दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करावे या प्रमुख मागण्या समितीच्या आहेत.
दुध ऊत्पादक संघर्ष समीतीच्या वतीने कोल्हार घोटी राज्य मार्गावर दूध ओतून आंदोलन केले. भीक नको... द्या घामाचा दाम... म्हणत अकोलेतुन दुध ऊत्पादक संघर्ष समीतीने दूध ओतून राज्य मार्गावर केले.

यावेळी माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री दशरथ सावंत (शेतकरी नेते), रिपाईचे राज्य सचिव विजयराव वाकचौरे, अगस्तीचे संचालक व शिवसेना नेते  महेशराव नवले, संभाजी ब्रिगेडचे विभागीय सचिव डॉ. संदीपराव कडलग, भाकपचे नेते शांताराम वाळुंज, संभाजी ब्रिगेडचे शिवश्री सोमनाथराव नवले, नगरसेवक सचिन शेटे, शुभम आंबरे, सुशांत आरोटे, स्वप्निल नवले, सुभाष बगनर, सचिन ताजने यांच्यासह सर्व शेतकरी व दुध ऊत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT