Recruitment  esakal
महाराष्ट्र बातम्या

Tribal Development Dept Bharti: आदिवासी विकास विभागात मेगा भरती; या संकेतस्थळावर करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Tribal Development Dept Bharti: राज्य शासनाने विविध विभागांतर्गत ७५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा केली असून, त्यातंर्गत आदिवासी विकास विभागात मेगा भरती होत आहे.

आदिवासी विकास विभागाकडून विविध १९ संवर्गातील ६०२ पदांसाठी मेगा भरती होत आहे. त्यासाठी १३ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. (Mega bharti in Tribal Development Department nashik news)

वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यकाची सर्वाधिक १८७ पदे असणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांना https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

राज्यात आदिवासी विकास विभागाचे चार अपर आयुक्तालय असून, त्या माध्यमातून दैनंदिन कामकाज केले जाते. सरळेसेवा भरती-२०२३ अंतर्गत आयुक्तालयात १६, नाशिक अपर आयुक्तालयात १६६, ठाणे अपर आयुक्तालयात १४५, अमरावती अपर आयुक्तालयात ८३, तर नागपूर आयुक्तालयात १९२ पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्जास गुरुवार (ता. २२)पासून प्रारंभ झाला आहे.

विविध संवर्गातील पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा होणार आहे.

परीक्षेचे स्वतंत्र वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. संवर्गनिहाय पदसंख्या, अटी-शर्ती, परीक्षा शुल्क तसेच अर्ज भरण्याच्या मार्गदर्शक सूचनांसह इतर माहितीसाठी उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाने केले आहे.

पदनिहाय संख्या

उच्च श्रेणी लघुलेखक (३), निम्न श्रेणी लघुलेख (१३), वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक (१४), संशोधन सहाय्यक (१७), उपलेखापाल/मुख्य लिपिक (४१), वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (१८७), लघुटंकलेक (५), गृहपाल (पुरुष) (४३), गृहपाल (स्त्री) (२५), अधीक्षक (पुरुष) २६, अधीक्षक (महिला) ४८, ग्रंथपाल ३८ प्रयोगशाळा सहायक (२९), आदिवासी विकास निरीक्षक (८), सहाय्यक ग्रंथपाल (१), प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी) २७, माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी) १५, उच्च माध्यमिक शिक्षणसेवक (१४), प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी) ४८.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Municipal Elections : काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार? ; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे संकेत!

तो घाबरला अन् गोंधळला! वियान मुल्डरवर लाराचा ४०० धावांना विक्रम न मोडल्याने Chris Gayle भडकला

सत्यभामा! सती परंपरेला बळी पडलेल्या निष्पाप स्त्रियांची गाथा, निस्सीम प्रेमाच्या त्यागाची कहाणी, पोस्टर पाहून तुम्हीही व्हाल भावूक!

Nashik Crime : सिडकोत भरदिवसा वृद्धाची हत्या; लाकडी दांडक्याने डोक्यात वार

Ulhasnagar News : उल्हासनगरात चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती; धीरज चव्हाण यांनी पदभार स्विकारला

SCROLL FOR NEXT