police recruitment sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात मेगा पोलीस भरती; 14000 हून अधिक जागांसाठी भरती

राज्यात 14956 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीची अखेर तारीख ठरलीय.

सकाळ वृत्तसेवा

राज्यात 14956 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीची अखेर तारीख ठरलीय.

मुंबई - राज्यात 14956 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीची अखेर तारीख ठरलीय. 1 नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला वेग येणार आहे. 1 नोव्हेंबरला जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तशा सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.

14000 हून अधिक जागा

महाराष्ट्रामध्ये बहुप्रतिक्षीत पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. त्याबाबतचे परिपत्रक पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांनी प्रसिध्द केले आहे.त्यानुसार फक्त पोलीस शिपाई पदांसाठीची ही भरती प्रक्रिया 14956 जागांसाठी असणार आहे असे नमूद करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस दल व पोलीस वाहन चालक यांची स्वतंत्र भरती प्रक्रिया त्याच वेळी सुरू होणार आहे. त्यामुळे जागांमध्ये काही बदल होऊ शकतो. पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 3 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच 27 दिवस असेल. अधिक माहितीसाठी उमेदवाराने policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

खोळंबलेल्या प्रक्रियेला भरती

2019 पासून पोलीस भरती प्रक्रिया खोळंबली होती या पार्श्वमीवर इच्छुक उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे पोलीस शिपाई पदासांठी होणाऱ्या या भरतीप्रक्रियेमध्ये प्रथम 50 गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. व त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातील पोलीस घटकांची एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे. शारीरीक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार 110 - प्रमाणात 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेत सुध्दा किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण 150 गुणांमधून केली जाणार आहे.कोरोना महामारीमुळे व इतर कारणानी पोलीस भरती प्रक्रिया लांबत गेली होती. उमेदवार खुप आशेने या भरती प्रक्रियेची वाट पहात होते आणि शासनाने सर्वात मोठी भरती प्रक्रिया सुरू केल्यामुळे उमेदवारांमध्ये उत्साहचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT