Lata Mangeshkar esakal
महाराष्ट्र बातम्या

लतादीदींच्या पत्रातून उलगडल्या नाशिकमधील आठवणी | Lata Mangeshkar

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलं, त्या देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्या 93 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे.

लता दीदींच्या अनेक आठवणी नाशिकशी जुळलेल्या आहे. अनेक कार्यक्रमांच्या निमीत्ताने लतादिदींचे नाशिकमध्ये येण झाल. 1968 साली लतादीदींनी नाशिकमधील एका कार्यक्रमासंबंधी स्वतः लिहीलेले पत्र पाठवले होते.

1968 साली नाशिकमधील कलावंताना हक्काच व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी नाशिक शहर सांस्कृतिक महामंडळातर्फे मधुरगीत गायन स्पर्धा (Golden singing competetion) आयोजित करण्यात आली होती. याच स्पर्धेला पाहुणे म्हणून लतादीदींना आमंत्रित करण्यात आले होते. महामंडळाच्या या विनंतीला प्रतिसाद देणार पत्र लतादीदींनी महामंडळाचे तत्कालीन सरचिटणीस वासुदेव दशपुत्रे यांच्या नावे स्वःहस्ते लिहून पाठवले होते.

नाशिक शहर सांस्कृतिक महामंडळाचे तत्कालीन सरचिटणीस वासुदेव दशपुत्रे यांच्या नावे लतादीदींनी स्वतः पत्र लिहून पाठवले होते.
लता दीदींनी लिहीलेले पत्र.

या स्पर्धेला लतादीदी स्वतः उपस्थित राहील्या नव्हत्या, त्याच आशयाचे हे पत्र त्यांनी महामंडळाला पाठवले होते.

आज त्यांच्या हस्ते लिहीलेल्या या पत्रामुळे लतादीदींचे नाशिकसोबत असलेल्या ऋणानुबंधांना व त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT