nitin raut nitin raut
महाराष्ट्र बातम्या

नितीन राऊत तुम्ही सांगा कुठे उपचार करणार? आम्ही खर्च करायला तयार

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : काँग्रेसचे नेते व ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर असताना आंबेडकर घराण्याबाबत केलेल्या घराणेशाहीच्या वक्तव्याबाबत वंचित बहुजन आघाडीमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वंचितच्या नेत्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा हल्लाबोल केला. त्यांच्या उपचारासाठी अकोल्यातील मानसोपचार तज्ज्ञांकडे मंत्री नितीन राऊत यांची नोंद करीत निषेध नोंदविला.

घराणेशाहीबद्दल बोलताना नितीन राऊत (Nitin Raut) यांना काँग्रेसच्या घराणेशाहीचा विसर कसा पडला? नेहरू नंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, मनेका गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी असे ओळीने पाया पडताय तर हरीजन काँग्रेसीचे ‘त्या’ बद्दल काय मत आहे, असा सवाल वंचित बहुजन युवा आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रदेश महासचिव व मीडिया पॅनसिल्ट राजेंद्र पातोडे यांनी विचारला आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांना भेटण्याची इतकीच ओढ होती तर चार दिवसाआधी बाळासाहेब नागपुरात होते, का गेला नाहीत? तुमच्यात दम असेल तर भाजपचे कोण नेते बाळासाहेब आंबेडकर यांना त्या तीन महिन्यांत भेटले, त्याचे पुरावे सार्वजनिक करा, अन्यथा नितीन राऊत यांना मानसिक उपचारासाठी अकोल्यात डॉ. केळकर यांची अपॉइंटमेंट बुक करू, नाहीतर आग्रा किंवा नागपूरमध्ये उपचार करून घेणार असाल तर आम्ही खर्च करायला तयार आहोत, अशी जळजळीत प्रतिक्रिया राजेंद्र पातोडे यांनी व्यक्त केली आहे.

‘वंचित’कडून तत्काळ कृती

डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या वक्तव्याबाबत वंचित बहुजन आघाडीमध्ये (Vanchit Bahujan Aaghadi) उमटलेल्या प्रतिक्रियांचे पडसाद कार्यकर्त्यांपर्यंतही पोहोचले आहे. त्यापैकी एकाने डॉ. दीपक केळकर यांच्या अकोला येथील रुग्णालयात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मानसोपचार करण्यासाठी ओपीडीमध्ये नोंद करून तीव्र भावना व्यक्त केल्यात. पावती क्रमांक ७३४५ नुसार नितीन राऊत नागपूर यांच्या उपचारासाठी २०० रुपयांचे शुल्क वंचितचे कार्यकर्ते सचिन शिराळे यांनी दिले आहे. उपचाराला पैसे कमी पडू देणार नाही, असा संकल्प युवा आघाडीने करून काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांच्या निषेध व्यक्त केला. राऊत यांच्या उपचारासाठी प्रत्येकी १० पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू करू, असेही कार्यकर्त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT